भाईंदरमध्ये 16 लाखांची कर थकबाकीदार इमारतीचा पाणीपुरवठा खंडित

By admin | Published: November 13, 2016 10:54 PM2016-11-13T22:54:26+5:302016-11-13T22:54:26+5:30

राज्य सरकारच्या आदेशानुसार उठविल्याचे एका इमारतीचा थकीत कराचा भरणा न केल्याने पाणीपुरवठा खंडित केल्यावरून स्पष्ट झाले आहे.

In Bhaindar, Rs 16 lakhs tax-deductible water supply damaged | भाईंदरमध्ये 16 लाखांची कर थकबाकीदार इमारतीचा पाणीपुरवठा खंडित

भाईंदरमध्ये 16 लाखांची कर थकबाकीदार इमारतीचा पाणीपुरवठा खंडित

Next

राजू काळे/ऑनलाइन लोकमत
भाईंदर, दि. 13 - मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी हजार, पाचशेच्या नोटा बंदीचा पुरेपूर फायदा राज्य सरकारच्या आदेशानुसार उठविल्याचे एका इमारतीचा थकीत कराचा भरणा न केल्याने पाणीपुरवठा खंडित केल्यावरून स्पष्ट झाले आहे. कर वसूलीसाठी पालिकेतील सुमारे दिड हजार अधिकारी, कर्मचाय्रांना रविवारी आयुक्तांनी थेट करदात्यांच्या दारी धाडले आहे. कर थकविणाय्रांच्या घरीदारी गेलेल्या पथकापैकी एकाचे प्रमुख अभियंता श्रीकृष्ण मोहिते यांनी भाईंदर पश्चिमेस असलेल्या
रॉयल रेसिडन्सी या इमारतीचा सुमारे 16 लाखांचा मालमत्ता कर थकल्याने पाणीपुरवठाच खंडीत करण्याची करवाई केली आहे. तत्पुर्वी मोहिते यांनी थकीत कर त्वरीत पालिकेत जमा करण्यास इमारतीतील संबंधितांना सांगितले होते. त्यास असर्थतता दर्शविल्यानेच कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. जुन्या नोटा जमा करणे व बदलण्याच्या गोंधळात पालिकेच्या कारवाईला भाईंदरची रॉयल रेसिडन्सी हि पहिली इमारत बळी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: In Bhaindar, Rs 16 lakhs tax-deductible water supply damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.