भामा आसखेड कालवा रद्द, राज्यात ७०० ठिकाणी आपला दवाखाना; मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 12:56 PM2023-06-28T12:56:20+5:302023-06-28T13:05:21+5:30

Cabinet Decisions Maharashtra Today: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

Bhama Askhed canal cancelled, Apala clinic at 700 places in the state; Important decisions in the cabinet meeting maharashtra, Eknath Shinde, Devendra Fadanvis | भामा आसखेड कालवा रद्द, राज्यात ७०० ठिकाणी आपला दवाखाना; मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय

भामा आसखेड कालवा रद्द, राज्यात ७०० ठिकाणी आपला दवाखाना; मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय

googlenewsNext

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्यभरात ७०० ठिकाणी स्वस्तात उपचार करणारे आपला दवाखाना उभारले जाणार आहेत. याचबरोबर निवृत्तीवेतनात भरीव वाढ , भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द, विविध तालुक्यांत न्यायालयांची स्थापना आदी निर्णय घेण्यात आले आहेत. 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय...

  • वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
  • एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती 
  • शिवडी न्हावा शेवा अटल सेतू असे नाव
  • राज्यात 700 ठिकाणी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. 210 कोटीस मान्यता.
  • भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ.
  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित. 2 कोटी कार्ड्स वाटणार, आता 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण. 
  • संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ 
  • आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ, करोडो कामगारांना लाभ मिळणार
  • नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग)
  • मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) येथे उभारणार. 100 कोटींच्या खर्चास मान्यता.
  • पूर प्रतिबंधासाठी राज्यातील 1648 किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार
  • मुंबई मेट्रो-3 मार्गासाठी धारावीचा भुखंड
  • भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
  • मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये

 

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Read in English

Web Title: Bhama Askhed canal cancelled, Apala clinic at 700 places in the state; Important decisions in the cabinet meeting maharashtra, Eknath Shinde, Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.