राज ठाकरेंकडून अयोध्येतील हनुमान गढी इथं भंडारा; मनसे १० दिवस लोकांना भोजन देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 07:38 PM2024-01-18T19:38:41+5:302024-01-18T19:40:03+5:30

महाराष्ट्रभर महाआरत्या करा, आनंद साजरा करा, पण लक्षात ठेवा आपल्या उत्साहाचा लोकांना त्रास होता कामा नये, असं आवाहन राज ठाकरेंनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलं होते. 

Bhandara at Hanuman Gadhi in Ayodhya from Raj Thackeray; MNS will give food to people for 10 days | राज ठाकरेंकडून अयोध्येतील हनुमान गढी इथं भंडारा; मनसे १० दिवस लोकांना भोजन देणार

राज ठाकरेंकडून अयोध्येतील हनुमान गढी इथं भंडारा; मनसे १० दिवस लोकांना भोजन देणार

मुंबई - येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात अयोध्येत भाविक दाखल होतील. त्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून अयोध्येतील हनुमान गढी येथील भंडाऱ्यासाठी मदत पाठवण्यात आली आहे. 

अयोध्येतील हनुमान गढी येथील महंत कल्याणदासजी मठासाठी १० दिवसांच्या भंडाऱ्याची सोय राज ठाकरेंकडून करण्यात आली आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी २३ तारखेपर्यंत महंत कल्याणदासजी यांनी भंडारा आयोजित केला आहे. याठिकाणी मनसेकडून १० दिवसांच्या भंडाऱ्याची मदत केली जाणार आहे. ही मदत मनसेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण यांच्या मार्फत अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी मदत पोहचवण्यासाठी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. 

अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. येत्या २२ जानेवारीला रामजन्मभूमीवर राममंदिराचा शिलान्यास होणार आहे. बलिदान झालेल्या लढलेल्या असंख्य कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय.  महाराष्ट्रभर महाआरत्या करा, आनंद साजरा करा, पण लक्षात ठेवा आपल्या उत्साहाचा लोकांना त्रास होता कामा नये, असं आवाहन राज ठाकरेंनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलं होते. 

देशभरातील मंदिरात स्वच्छता कार्यक्रम 

२२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर लोकांनी त्यांच्या सोयीनुसार येथे येण्याचे नियोजन करावे. लगेच येण्याची घाई करू नये. या क्षणाची आपण ५०० वर्षे वाट पाहिली, तर आणखी काही दिवस वाट पाहण्यात काहीही नुकसान होणार नाही. १४ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत तीर्थक्षेत्र आणि देशातील प्रत्येक मंदिरात स्वच्छतेचे कार्यक्रम घेण्यात यावेत. घरी राहूनच सर्वांनी श्रीरामज्योती प्रज्वलित करा, दिवाळीसारखा सण साजरा करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होते. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबईतील मंदिरे व महत्वाच्या इमारतींना रोषणाई करा, अशा सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या

Web Title: Bhandara at Hanuman Gadhi in Ayodhya from Raj Thackeray; MNS will give food to people for 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.