भंडारा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची 'बॅण्ड पार्टी'!

By admin | Published: July 29, 2016 07:54 PM2016-07-29T19:54:47+5:302016-07-29T19:54:47+5:30

ज्य शासनाच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमासाठी पोषाखाचा ह्यप्रोटोकॉलह्ण आहे. भंडारा जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख जोधपुरी

Bhandara Zilla Parishad officers' band party! | भंडारा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची 'बॅण्ड पार्टी'!

भंडारा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची 'बॅण्ड पार्टी'!

Next

प्रशांत देसाई,  भंडारा
राज्य शासनाच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमासाठी पोषाखाचा ह्यप्रोटोकॉलह्ण आहे. भंडारा जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख 'जोधपुरी' हा भारतीय पोषाख परिधान करून ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे छायाचित्र भंडारा जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सुधीर वाळके यांनी २२ जुलैला फेसबुकवर अपलोड केला. या फोटोला त्यांनी उपहासात्मक 'बॅण्ड पार्टी आॅफ झेडपीबी' असे नाव लिहिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

राष्ट्रीय दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची ध्वजारोहणासाठी उपस्थिती लावावी लागते. भंडारा जिल्हा परिषद प्रांगणात ध्वजारोहणाच्या सोहळ्यासाठी येथील सर्व विभाग प्रमुख व त्यांचे अधिनस्थ कर्मचारी एकत्र आले होते. अधिकाऱ्यांच्या ह्यप्रोटोकॉलह्णनुसार सर्व विभागप्रमुख काळ्या रंगाचा ह्यजोधपुरीह्ण हा पोषाख परिधान करून एका ओळीत उभे असलेला फोटो उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून २२ जुलैला रात्री ९.४७ वाजता अपलोड केला.

या फोटोत जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके स्वत: रांगेत पहिल्यास्थानी उभे आहेत. त्यांच्यासह अन्य विभागाचे विभागप्रमुखही उभे आहेत. वाळके यांनी फेसबुकवर अपलोड करून त्या फोटोला ह्यबॅण्ड पार्टी आॅफ झेडपीबीह्ण असे नाव दिल्याचा संतापजनक प्रकार केला आहे. यावर जिल्हा परिषद सदस्य संदीप टाले यांनी, ह्यकोणाच्या लग्नात वाजवायचे आहेह्ण अशी प्रतिक्रिया दिली. या फोटोवर सहाजणांनी प्रतिक्रिया दिली असून शेवटची प्रतिक्रिया शांतिदास लुंगे (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लेंडेझरी) यांनी, व्हेरी नाइस फॉर पब्लिक वेलफेअर अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमाच्या फोटोचा दुरूपयोग करून त्यांना बॅण्ड पथकवाले संबोधल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

लग्न सोहळ्यात बॅण्ड वाजविणाऱ्या वाजंत्रिला बॅण्ड पार्टी असे संबोधतात. परंतु भंडारा जिल्हा परिषदचे अधिकारी हे सक्षम, नेतृत्व करणारे आहेत. त्यामुळे कामात पारदर्शकता ठेवून जिल्हा परिषदेला विकासाकडे नेण्यासाठी सर्वात पुढे असलेले या अर्थाने अधिकाऱ्यांच्या फोटोला बॅण्ड पार्टी असे नाव दिले. याचा कुणीही चुकीचा अर्थ लावू नये.
- सुधीर वाळके,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा

Web Title: Bhandara Zilla Parishad officers' band party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.