भंवरलाल जैन हे आधुनिक कृषी विज्ञानाचे प्रणेते

By admin | Published: March 10, 2016 03:53 AM2016-03-10T03:53:25+5:302016-03-10T03:53:25+5:30

भारतीय पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत कृषी क्रांती घडविणारे भंवरलालजी हे आधुनिक कृषी विज्ञानाचे प्रणेते होते, अशा शब्दात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जैन उद्योग समूहाचे संस्थापक दिवंगत

Bhanwarlal Jain is the father of modern agricultural science | भंवरलाल जैन हे आधुनिक कृषी विज्ञानाचे प्रणेते

भंवरलाल जैन हे आधुनिक कृषी विज्ञानाचे प्रणेते

Next

मुंबई : भारतीय पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत कृषी क्रांती घडविणारे भंवरलालजी हे आधुनिक कृषी विज्ञानाचे प्रणेते होते, अशा शब्दात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जैन उद्योग समूहाचे संस्थापक दिवंगत भंवरलाल जैन यांना श्रद्धांजली वाहिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत खडसे यांनी जैन यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. यावेळी ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील वाकोद या छोट्याशा गावात जन्मलेल्या भंवरलाल जैन यांनी शेतीमधील सिंचनासाठी पीव्हीसी पाईप बनविण्यास सुरुवात केली. ठिबक आणि तुषार सिंचनाचा हा उद्योग देशभर पोहचवला. शेतक-याचे आयुष्य सुखी व समाधानी व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. शेती संसोधनाच्या माध्यमातून शेतक-याचे आयुष्य सुखी व समाधानी व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले, अशा शब्दात खडसे यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,उद्योगमंत्री सुभाष देसाई शरद रणपिसे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.बर्धन, जैन, निहालभार्इंना
विधानसभेत श्रद्धांजली
कम्युनिस्ट नेते भाई बर्धन, प्रख्यात उद्योगपती भंवरलाल जैन, माजी विरोधी पक्षनेते निहाल अहमद, माजी मंत्री डॉ.दौलतराव आहेर यांच्यासह दिवंगत माजी सदस्यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आदींची शोकप्रस्तावावर भाषणे झाली. भाई बर्धन यांच्या निधनाने देशाने एक झुंजार कामगार नेता गमावला आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Web Title: Bhanwarlal Jain is the father of modern agricultural science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.