भातरोपांना जीवदान

By Admin | Published: June 27, 2016 01:36 AM2016-06-27T01:36:45+5:302016-06-27T01:36:45+5:30

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वरुणराजाची कृपा होऊन पावसाला सुरुवात झाल्याने भातरोपांना जीवदान मिळाले आहे.

Bhararpak alive | भातरोपांना जीवदान

भातरोपांना जीवदान

googlenewsNext


पवनानगर : पावसाला शनिवारी रात्री सुरुवात झाली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वरुणराजाची कृपा होऊन पावसाला सुरुवात झाल्याने भातरोपांना जीवदान मिळाले आहे.
पावसाला जोर नसला, तरी शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केले. पवना धरण परिसरात २० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. आजअखेर ६९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणात १२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस सुरू झाल्याने भातरोपाला जीवदान मिळाले असून, नाचणी पिकाच्या रोपाची डोंगरमाथ्यावरील पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.
पावसामुळे काल्यार्त पर्यटकांची हजेरी
कार्ला : परिसरात शुक्रवारपासून पावसाला सुरुवात झाल्याने पुणे, मुंबईतील पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे या परिसरात वेगवेगळे व्यवसाय करणारे व्यावसायिक समाधानी दिसत आहेत.
कार्ला, भाजे परिसरात दर वर्षी पाऊस सुरू झाल्यास पुणे-मुंबईतील पर्यटकांसह संपूर्ण राज्य-परराज्यांतूनही पर्यटक भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. या वर्षी पाऊस १५ दिवस उशिराने आला. त्यामुळे पावसाबरोबर पर्यटकांनी पाठ फिरविली होती. परंतु तुरळक का होईना कार्ला, भाजे परिसरात पाऊस पडत असल्याने पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी दिसत आहे. चांगला पाऊस झाला की, या भागातील धबधबे वाहण्यास सुरू होतील. तसतशी पर्यटकांची संख्या वाढत जाईल. पावसाची आवश्यकता आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे विक्री वाढल्याने चिक्की व्यावसायिक, रिक्षावाले, हॉटेल व्यावसायिक व इतर किरकोळ व्यावसायिक समाधानी दिसत
होते. (वार्ताहर)
उर्से : दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत बसलेल्या शेतकरी वर्गासाठी दोन दिवसांपासून पडणारा पाऊस शेतातील पेरणीसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. सध्या भुईमूग, वाटाणा, घेवडा, वाल, मूग, चवळी पेरणीसाठी शेतकरी तयारीला लागला आहे.

Web Title: Bhararpak alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.