दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत भारत बंदचा परिणाम; स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवली ट्रेन, 24 पक्षांचा बंदला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 10:19 AM2020-12-08T10:19:05+5:302020-12-08T10:20:28+5:30

पोलिसांनी आंदोलन करत्यांना ट्रॅकवरून हटवले आणि ताब्यात घेतले. (Bharat Bandh)

Bharat bandh India Delhi to Maharashtra Swabhimani Shetkari Saghtana briefly stopped a train in Buldhana dist | दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत भारत बंदचा परिणाम; स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवली ट्रेन, 24 पक्षांचा बंदला पाठिंबा

दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत भारत बंदचा परिणाम; स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवली ट्रेन, 24 पक्षांचा बंदला पाठिंबा

Next


नवी दिल्ली - केंद्रसरकारने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करत आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदनुसार, सकाळी 11 वाज्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत चक्का जाम करण्यात येणार आहे. देशातील जवळपास दोन डझन राजकीय पक्षांनी या बंदला पाठींबा दर्शवला आहे. याशिवाय अनेक संघटनाही शेतकऱ्यांच्या बाजुने उभ्या ठाकल्या आहेत. आजच्या भारत बंदमुळे अनेक ठिकाणच्या दळणवळणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातही भारतबंदचा परिणाम, रेल्वे अडवली - 
आजच्या भारतबंदला महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे रेल्वे अडवली होती. यानंतर पोलिसांनी आंदोलन करत्यांना ट्रॅकवरून हटवले आणि ताब्यात घेतले.

पुण्यातील APMC मार्केट खुले, ट्रेडर्स म्हणाले - शेतकऱ्यांना समर्थन -
आमच्या शेतरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, आज आम्ही बाजारपेठ सुरूच ठेवणार आहोत. जेणेकरून इतर राज्यांतून येणारा शेतकऱ्यांचा माल साठता यावा अन्यथा तो कुजेल. तो उद्या विकला जाईल, असे स्थानिक व्यापारी सचिन पायगुडे यांनी म्हटले आहे. 

वेगवेगळ्या राज्यांत कडेकोट सुरक्षा व्यवस्था -
शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वेवगेळ्या राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बिहारमध्ये कडेकोट सुरक्षा आहे. एवढेच नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्ली येथील सिंधू सीमेवरही बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. 

याशिवाय देशातील अनेक राज्यांत वेगवेगळे राजकीय पक्ष या बंदला पाठिंबा दर्शवत रस्त्यावर उतरले आहेत. ओडिशातही भारत बंदच्या समर्थनार्थ डाव्या पक्षांनी भुवनेश्वर येथे रेल्वे अडवल्या. तसेच भारत बंदमध्ये तृणमूल काँग्रेसचा सहभाग नाही, मात्र, शेतकरी आंदोलनास आमचा पाठिंबा आहे, असे ममत बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

तेलंगणातील बस चालक-वाहक शेतकऱ्यांच्या समर्थनात -
कामारेड्डी येथील रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एका बसचालकाने म्हटले आहे, "मुख्यमंत्र्यांनी कृषी कायद्यांविरोधात आवाज उठविला. त्यांना पाठिंबा देत, आम्ही आरटीसीचे कामगार येथे आंदोलन करत आहोत. शेतकर्‍यांवर अन्याय होऊ नये."



शेतकऱ्यांच्या भारत बंदला कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांचाही पाठिंबा -
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारतबंदला कर्नाटकातील काँग्रेस नेतांनीही पाठींबा दर्शवला आहे. एवढेच नाही, तर या नेत्यांनी केंद्राविरोधात घोषणाबाजीही केली आणि बेंगळुरूतील विधान सौधा येथील गांधी पुतळ्यासमोर काळे झेंडेही दाखविले. यावेळी पक्षाचे नेते सिद्धरामैय्या, बीके हरिप्रसाद, रामलिंग रेड्डी आदी उपस्थित होते.

या पक्षांचा भारतबंदला पाठिंबा -
1.काँग्रेस
2.माकपा
3.डीएमके
4.सीपीआई
5.राजद
6. एनसीपी
7.जेएमएम
8.सपा 
9. शिवसेना
10.अकाली दल
11.भाकपा-माले
12. गुपकार गठबंधन
13.टीएमसी
14.टीआरएस
15.एआयएमआयएम
16. आम आदमी पार्टी
17. पीडब्ल्यूपी
18. बीवीए
19. आरएसपी
20. एफबी
21. एसयूसीआय (सी)
22. स्वराज इंडिया
23.जेडीएस
24. बसपा

Web Title: Bharat bandh India Delhi to Maharashtra Swabhimani Shetkari Saghtana briefly stopped a train in Buldhana dist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.