धर्माबाद शहरात भोंदूबाबास अटक
By admin | Published: June 24, 2016 10:53 PM2016-06-24T22:53:32+5:302016-06-24T22:53:32+5:30
अज्ञान व अंधश्रद्धेचा फायदा घेत अनेकांना गंडविणाऱ्या भोंदूबाबावर गुन्हा दाखल करुन धर्माबाद पोलिसांनी त्यास अटक केली. विशेष म्हणजे, हा भोंदूबाबा केंद्र शासनाचा कर्मचारी
ऑनलाइन लोकमत
धर्माबाद (जि. नांदेड), दि, २४ - अज्ञान व अंधश्रद्धेचा फायदा घेत अनेकांना गंडविणाऱ्या भोंदूबाबावर गुन्हा दाखल करुन धर्माबाद पोलिसांनी त्यास अटक केली. विशेष म्हणजे, हा भोंदूबाबा केंद्र शासनाचा कर्मचारी असूनही भोळ्याभाबड्या नागरिकांंची फसवणूक करीत होता.
येथील गांधीनगरातील रहिवासी व टपाल कार्यालयातील पोस्ट मास्टर डॉ. तौफीकखान पठाण हे जादूटोणा, मंत्र, औषधाने अनेक रोग बरे करतो असे म्हणून अनेक वर्षांपासून अज्ञानी व अंधश्रद्धाळू नागरिकांना फसवित असे. भविष्य, हस्तरेषा बघून पुढे काय होणार सांगतो असे म्हणून अनेक राजकीय लोकांचे नावही घेतो. येथील एका व्यक्तीस मनोरुग्ण असल्याचे त्यावर उपचार करुन बरा करतो म्हणून फसविल्याची तक्रार त्याच्या बहिणीने केली आहे.
आसीफ (वय ४०) यास सात वर्षांपासून मनोरुग्ण असल्याचे सांगून साते ते आठ लाख रुपयास गंडविल्याची तक्रार आसीमची बहीण नौसीन ऊर्फ आतिमा बेगम सिकंदर हिने धर्माबाद ठाण्यात दिली.
दिलेल्या तक्रारीवरून धर्माबाद पोलिसांनी महाराष्ट्र अनिष्ट रुढी, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रति अधिनियम २०१३, कलम २ (५) (८) या कायद्याप्रमाणे तौफीकखान पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी दिली.