भिर्रर्रर्र...ची आरोळी पुन्हा गुंजणार

By admin | Published: January 9, 2016 01:41 AM2016-01-09T01:41:17+5:302016-01-09T01:41:17+5:30

केंद्र सरकारने बैलगाडा शर्यती सुरू केल्यानंतर बैलगाडामालकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष केला. शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून आता

Bharrrrr ... ... the screams again | भिर्रर्रर्र...ची आरोळी पुन्हा गुंजणार

भिर्रर्रर्र...ची आरोळी पुन्हा गुंजणार

Next

केंद्र सरकारने बैलगाडा शर्यती सुरू केल्यानंतर बैलगाडामालकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष केला. शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून आता जिल्ह्यात पारंपरिक यात्रा उत्सवांमध्ये भिर्रर्रर्र...ची आरोळी पुन्हा गुंजणार आहे. गेली दोन वर्षांपासून बंद असलेल्या बैलगाडाशर्यती सुरू करण्यासाठी बैलगाडामालकांनी सर्वत्र आंदोलने, चक्का जाम करून सरकारचे लक्ष वेधले होते. यासंदर्भात वेळप्रसंगी बैलगाडामालकांनी न्यायालयातही धाव घेतली होती. अगदी पदरमोड करून अनेक बैलगाडामालकांनी दिल्ली वाऱ्या केल्या. अगदी पंजाब, तमिळनाडू आदी राज्यांत जाऊन त्यांनी बैलगाडामालकांचे संघटन केले. बैलगाडामालकांच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले आहे.
पदरमोड करून बैलगाडामालकांचे संघटन
मंचर : पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यती सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे शर्यती सुरू होण्यासाठी राजकीय नेतृत्वापासून सर्वसामान्य बैलगाडामालकांनी विशेष प्रयत्न केले. पदरमोड करून अनेक बैलगाडामालकांनी दिल्ली वाऱ्या केल्या. अगदी पंजाब, तमिळनाडू आदी राज्यांत जाऊन त्यांनी बैलगाडामालकांचे संघटन केले. बैलगाडामालकांच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले आहे.
बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी तालुक्यात अनेकवेळा आंदोलने झाली. २००६ मध्ये बैलगाडामालकांच्या आंदोलनाला मंचर येथे हिंसक वळण लागून झालेली घटना राज्यभर गाजली. तालुक्यात बैलगाडामालकांसाठी २ विमा योजना आहेत. त्यांनीही पुढाकार घेतला. शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेतृत्वाने बैलगाडामालकांना साथ दिली. शर्यती सुरू होण्यासाठी अनेक बैलगाडामालकांनी दिल्ली वाऱ्या केल्या. लोकवर्गनी गोळा करून त्यांनी शर्यती सुरू होण्यासाठी लढा दिला. त्याला आज यश आले आहे. दिल्ली येथे राहण्याचा व खाण्याचा खर्च बैलगाडामालक स्वत: करीत होते.
बैलगाडामालकांचे शिष्टमंडळ अनेकवेळा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सुप्रिया सुळे, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना जाऊन भेटले, त्यांनी पाठपुरावा केला.
तमिळनाडू राज्यात जलीकट्टू व पंजाब राज्यात छकडी दौड होते. तेथील बैलगाडामालकांशी संपर्क करून, त्यांना एकत्रित करण्यात आले व एकत्रित प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला होता. तालुक्यातील काही बैलगाडामालक ४ ते ५ वेळा या राज्यांत जाऊन आले. आजच्या निर्णयाने त्यांना सर्वाधिक समाधान वाटले आहे. (वार्ताहर)व्यावसायिक व वाजंत्री यांना येणार ‘अच्छे दिन’
बैलगाडा शर्यतीच्या वेळी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा चांगला व्यवसाय होतो. यामध्ये हॉटेल, थंड पेयांची दुकाने, विविध वस्तू, खेळणी यांची दुकाने थाटली जातात. पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्या वाजंत्री मंडळींना तर सर्वाधिक मागणी असते. शर्यतीवर बंदी आल्याने हे व्यवसाय बंद झाले. वाजंत्री मंडळींना काम मिळेना. आता शर्यतीवरील बंदी उठल्याने, या व्यावसायिकांना व वाजंत्री मंडळींना ‘अच्छे दिन’ येणार आहेत. अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. त्यांना पुन्हा काम व रोजगार मिळणार आहे. पहाडी आवाजात निवेदन करणारे अनाउन्सर (निवेदक) कुठेच दिसत नव्हते, त्यांना आता पुन्हा पूर्वीसारखे काम करता येणार आहे.
बैलगाडामालकांनी दीड वर्ष केलेल्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. ग्रामीण भागासाठी शर्यती महत्त्वाची होत्या. शर्यतबंदीमुळे गावोगाव होणाऱ्या यात्रा जवळ-जवळ बंद झाल्या होत्या. अर्थकारण ठप्प झाले होते. आता शर्यतीवरील बंदी उठल्याने ग्रामीण भागाची परंपरा अखंड सुरू राहील. यापुढेही न्यायालयीन लढा लढला जाईल.
- बाळासाहेब आरुडे
याचिकाकर्ते व
बैलगाडामालक, अवसरी
कु ठल्याही गोष्टीला कायमस्वरूपी बंदी हा पर्याय नाही. शर्यती सुरू झाल्या. आता बैलगाडामालकांनी नियम व अटीचे पालन करावे म्हणजे शर्यती सुरळीत सुरू राहतील. ग्रामीण जनतेचे अर्थकारण ठप्प झाले होते. आता ते सुरळीत होईल. यात्रेचे आयोजन करताना आयोजकांनी अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे.
- नितीन शेवाळे
बैलगाडामालक,
याचिकाकर्ते, हडपसर

Web Title: Bharrrrr ... ... the screams again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.