देश-विदेशातील चित्रकारांच्या भेटीने भारावले चंद्रपुरचे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 05:28 AM2019-10-05T05:28:41+5:302019-10-05T05:29:51+5:30
जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने ‘जवाहरलाल दर्डा मेमोरियल आर्ट कॅम्प’मध्ये इरई सफारी रिट्रिट ताडोबा (चंद्रपूर) येथे देश-विदेशातील प्रसिद्ध कलाकार आपल्या कुंचल्यातून विविध चित्र साकारत आहेत.
चंद्रपूर : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने ‘जवाहरलाल दर्डा मेमोरियल आर्ट कॅम्प’मध्ये इरई सफारी रिट्रिट ताडोबा (चंद्रपूर) येथे देश-विदेशातील प्रसिद्ध कलाकार आपल्या कुंचल्यातून विविध चित्र साकारत आहेत. शिबिरादरम्यान चंद्रपुरातील कलाकारांनी त्यांची भेट घेत चित्रकलेविषयी बारकावे जाणून घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे स्थानिक कलाकार भारावले असून या कॅम्पमुळे चित्रकलेतील अनेक गोष्टींची माहिती मिळाल्याचे स्थानिक कलाकारांनी सांगितले. एवढेच नाही, तर सदर कॅम्प चंद्रपुरसारख्या ग्रामीण भागात घेतल्यामुळे त्यांनी समाधानही व्यक्त केले आहे.
चंद्रपुरातील प्रसिद्ध चित्रकार सुदर्शन बारापात्रे, सदानंद पचारे, सुमित लोहकरे, देवा रामटेके, किरम पराते, स्वामी साळवे, सुहास ताटकंटीवार, मार्कडेवार आदींनी या कलाकारांची त्यांची भेट घेतली. यावेळी चिंत्र रंगविण्याची पद्धत, रंगाविषयी वेगळेपण, मार्केट व्हॅल्यू, चित्रामध्ये काम कसे करायचे, निर्मिती कशी करावी, आकार कसा शोधायचा, चित्राला रंग देताना कसा विचार करायचा, यावर या कलाकारांनी चर्चा करून विविध प्रश्नांचे समाधानकारक उत्तरही दिल्याचे येथील कलाकारांनी सांगितले. या कॅम्पमुळे आम्हाला मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.