भातसा, बारवी धरणांनी गाठला तळ; अत्यल्प जलसाठा शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:20 AM2019-06-03T04:20:49+5:302019-06-03T04:20:57+5:30

भातसात २८ टक्के, तर बारवी धरणात केवळ २३ टक्के पाणीसाठा

Bhatsa, bar near the barvi dam; Low water reservoir | भातसा, बारवी धरणांनी गाठला तळ; अत्यल्प जलसाठा शिल्लक

भातसा, बारवी धरणांनी गाठला तळ; अत्यल्प जलसाठा शिल्लक

googlenewsNext

सुरेश लोखंडे 

ठाणे : मुंबई, ठाणे या महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात २७० दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ २८.७१ टक्के, तर ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात अवघा २३.५५ टक्के म्हणजे ५४.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा सद्य:स्थितीत शिल्लक आहे. धरणातील या पाण्याची उपलब्धता लक्षात घेता, धरण क्षेत्रात अल्पावधीतच पावसाचे आगमन होणे अपेक्षित आहे. अन्यथा, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे महानगरांना पाणीपुरवठा करणाºया धरणांपैकी भातसा हे सर्वात मोठे ब्रिटिशकालीन जलाशय आहे. या धरणाची ९४२.१०० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. यापैकी धरणात सध्या २७०.४९० दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी या धरणात आजच्या दिवशी ३२९.७१ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३५ टक्के पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस पडूनही या धरणात अल्पावधीसाठी पुरेल एवढाच पाणीसाठा जलाशयात शिल्लक आहे. बारवी धरणात ४६ दिवस पुरेल एवढाच, म्हणजे २३.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
बारवीची २३३.०७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठवण क्षमता आहे. आज या धरणात ५४.८९ दशलक्ष घनमीटर साठा असून, गेल्या वर्षी हा ८३.२९ दशलक्ष घनमीटर साठा होता. मोडकसागर धरणात ३४.२७ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ४४.१२ टक्के होता.
तानसात ९.८४ टक्के साठा आहे, गेल्या वर्षी १६.८९ टक्के होता. बारवीप्रमाणेच ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भाईंदर आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणातही ९०.९० दशलक्ष घनमीटर म्हणजे २६.८० टक्के साठा आहे. गेल्या वर्षी या धरणात ३२ टक्के साठा होता.

टाटाच्या मालकीचे असलेल्या या आंध्रा धरणातील पाणी उल्हास नदीत सोडले जाते आणि तेच पाणी ठाणे जिल्ह्यातील शहरांना उपलब्ध करून दिले जाते. पण, या धरणातही यंदा कमी साठा आहे.

त्यामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यांतील शहरांना पाणीपुरवठा करणाºया धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन होण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. अन्यथा, १५ जुलैपर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Bhatsa, bar near the barvi dam; Low water reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.