इगतपुरीतील भावली धरण फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 03:55 PM2017-07-22T15:55:39+5:302017-07-22T15:57:43+5:30
संपूर्ण इगतपुरी तालुक्याची पिण्याच्या पाण्याची भिस्त असलेले भावली धरण पूर्ण भरल्याने आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले
Next
>ऑनलाइन लोकमत
घोटी (नाशिक), दि. 22 - संपूर्ण इगतपुरी तालुक्याची पिण्याच्या पाण्याची भिस्त असलेले भावली धरण पूर्ण भरल्याने आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. भावली धरण पाच दिवसांपूर्वी पूर्णपणे भरल्याने आज या धरणाची विधिवत शासकीय जलपूजन करण्यात आले.
यावेळी या धरणाच्या पाणीसाठ्याबाबत आढावा घेवून या धरणाच्या संपूर्ण पाण्याचे पूर्ण तालुक्याला लाभ होईल, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. हे धरण पर्यटनासाठी अव्वल असल्याने धरण परिसर सुशोभित करुन जनतेसाठी चांगल्या दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित होण्यासाठी आपण प्राधान्य देऊ, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
भावली धरणाच्या जलपूजनावेळी आमदार निर्मला गावीत, कार्यकारी अभियंता आर एस शिंदे, रमेश गावित, तहसीलदार अनिल पुरे, कार्यकारी शाखा अभियंता सुहास पाटील, पांडुरंग शिंदे, भास्कर गुंजाळ, पंकज माळी, गुलाब वाजे, साहेबराव धोंगडे, कैलास घारे, जगन शेलार, विजय कडू, सौ मंजुळा भले, त्र्यंबक गुंजाळ, सोमनाथ जोशी, सामाजिक कार्यकर्त्या आशा शिंदे, किरण फलटणकर, साहेबराव धोंगडे, यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले.
उत्तर महाराष्ट्रात त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सर्वप्रथम इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले, निसर्गाची कृपा व वरदहस्त या इगतपुरी मतदार संघावर कायम असो. त्याचबरोबर मतदारसंघातील उर्वरित अन्य धरणेही लवकरात लवकर भरो, जलसंपदा हीच खरी राष्ट्रीय संपत्ती आहे. संपूर्ण जनतेला या पाण्याचा लाभ होवो. तालुक्यातील व मतदारसंघातील जनता सुखी समाधानी व संपन्न होवो, अशी प्रार्थना यावेळी आमदार निर्मला गावित यांनी केली. अर्ध्या महाराष्ट्राला पिण्याचे व सिंचनाचे पाणी पुरवणाऱ्या दारणा, मुकणे, कडवा, वाकी व वैतरणा धरणही लवकर भरो, अशीही प्रार्थना यांनी यावेळी केली.