‘पद्मश्री’साठी सुचविले होते भिडे गुरुजी यांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 03:37 AM2018-03-02T03:37:45+5:302018-03-02T03:37:45+5:30
कोरेगाव-भीमामधील दंगलीवरून गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांच्या नावाची शिफारस राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे केली होती, अशी माहिती समोर आली आहे.
मुंबई : कोरेगाव-भीमामधील दंगलीवरून गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांच्या नावाची शिफारस राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे केली होती, अशी माहिती समोर आली आहे.
विविध क्षेत्रात कार्यरत महनीय व्यक्तींच्या नावांची शिफारस पद्म पुरस्कारांसाठी केंद्र सरकारला करण्याकरता राज्य शासनाची एक उच्चाधिकार समिती असते. समितीत १० ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश असून गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता अध्यक्ष आहेत. भिडे गुरुजींनी अर्ज केलेला नसताना समितीने आपल्या अधिकारात त्यांचे नाव सुचविले होते. २०१६ साठीच्या पुरस्कारासाठी ही शिफारस होती.
या समितीचे अध्यक्ष गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे आहेत. समितीने भिडे गुरुजींसह १५ नावांची शिफारस विविध पद्म पुरस्कारांसाठी केली होती.
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचारामागे भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.