चैत्यभूमीवर भीमसागराला उधाण
By admin | Published: December 7, 2014 02:10 AM2014-12-07T02:10:50+5:302014-12-07T02:10:50+5:30
‘जय भीम’चा घोष करीत खेडापाडय़ातून शिवाजी पार्कवर लोटलेल्या लाखो भीमसैनिकांनी भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना आज आदरांजली वाहिली़
Next
मुंबई : ‘जय भीम’चा घोष करीत खेडापाडय़ातून शिवाजी पार्कवर लोटलेल्या लाखो भीमसैनिकांनी भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना आज आदरांजली वाहिली़ आपल्या लाडक्या नेत्याच्या
58व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी
निळी लाटच चैत्यभूमीवर उसळली होती़
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ़ आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आलेल्या अनुयायांमध्ये या वेळेस उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश अशा राज्याबाहेरील भीमसैनिकांची संख्या अधिक होती़ दादर पश्चिम रेल्वे स्थानकांपासून शिस्तबद्ध रांगेतून अनुयायांचे जत्थे चैत्यभूमीच्या
दिशेने वळत होत़े सकाळपासून अनुयायांची रीघ चैत्यभूमीवर
लागली होती़ दुपारनंतर खासगी बस, ट्रॅक, टॅम्पो भरून अनुयायी चैत्यभूमीवर येऊ लागल़े एकच साहेब बाबासाहेब, जब तक सुरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा,
अशा घोषणा देत तरुण-वृद्ध,
मुले, महिला चैत्यभूमीवर दाखल
होत होत्या.
अनुयायांच्या मार्गातील विघ्न दूर करण्यासाठी पोलीस व पालिका कर्मचा:यांची तारांबळ उडाली होती़ अधूनमधून नेतेमंडळींच्या हजेरीमुळे रांगेला ब्रेक लागत होता़ दुपार्पयत अनुयायांची रांग वरळी सीफेसर्पयत पोहोचली होती़ मात्र आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन केल्याशिवाय हलायचे नाही, असे ध्यास घेऊन आलेले अनुयायी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे होत़े रांगेत उभे राहणो शक्य नसलेल्या वृद्धांसाठी शिवाजी पार्कवरील मैदानात लावलेल्या मोठय़ा पडद्यावर चैत्यभूमीचे थेट प्रक्षेपण करण्यात येत होत़े (प्रतिनिधी)
अवतरली निळी तरुणाई : लहानांपासून थोरांर्पयत प्रत्येक भीमसैनिक डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर हजेरी लावत असतो़ मात्र या वर्षी तरुणवर्गाचे प्रमाण सर्वाधिक होत़े मार्गदर्शक पुस्तकांच्या खरेदीमध्येही तरुणवर्ग आघाडीवर होता़ माहितीपर, विचारवंतांच्या पुस्तकांना सर्वाधिक पसंती मिळत होती़ त्यामुळे संध्याकाळर्पयत पुस्तकांची सर्वाधिक विक्री झाली होती़ भारतीय संविधान, बुद्ध आणि त्याचा धम्म आणि शूद्र म्हणजे कोण? आदी पुस्तकांना अधिक पसंती मिळाली़
फुग्याने
दाखविली दिशा
खेडय़ापाडय़ातून मुंबईत येणा:या अनुयायांसाठी शिवाजी पार्कवर अन्न व निवा:याची सोय करण्यात येत़े मात्र अनेक वेळा याबाबत अनुयायांना माहिती नसत़े त्यामुळे त्यांना शिवाजी पार्कच्या दिशेने वळविण्यासाठी मैदानाच्या मध्यभागी आकाशात मोठा फुगा सोडण्यात आला होता़ पालिकेमार्फत हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला़ मात्र या परिसरात इमारतींची उंची अधिक असल्याने पुढच्या वर्षी फुगा आणखी उंच व त्याचा आकार मोठा करण्यात येईल, असे जी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितल़े
मोफत शिबिर
गावातून आलेल्या अनुयायांना सुविधा व पैशाअभावी आरोग्याकडे लक्ष देता येत नाही़ अशा अनुयायांच्या आरोग्य तपासणीसाठी पालिकेच्या केईएम, सायन व नायर रुग्णालयातील डॉक्टर तीन दिवसांपासून तैनात आहेत़ यामध्ये पेडियाट्रिक सजर्न, न्यूरो सजर्न, अस्थिव्यंग तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञांचा समावेश होता़ तीन ठिकाणी लावण्यात आलेल्या अशा शिबिरांमध्ये दररोज सरासरी दीड ते दोन हजार अनुयायांनी उपचार घेतले.
शिवाजी पार्कवर आरपीआयच्या गटात हाणामारी
1डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखोंचा समुदाय दाखल झाला असतानाच शिवाजी पार्क मैदानात सायंकाळी आरपीआयच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. हिंदुत्ववादी भारतीय जनता पार्टीमध्ये आठवले गट विलीन झाल्याची टीका सेक्युलर गटाच्या नेत्यांनी केल्याने या वादाल तोंड फुटले. या टीकेनंतर शिवाजी पार्क मैदानात सभेसाठी उभारलेल्या व्यासपीठाजवळच सायंकाळी आठवले आणि सेक्युलर गटाच्या कार्यकत्र्यामध्ये बाचाबाची झाली.
2कालांतराने या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी कार्यकत्र्यानी सभेसाठी लावण्यात आलेल्या खुच्र्याही एकमेकांवर फेकल्या. या वेळी प्रसंगावधान राखत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. शिवाय दोन्ही गटांच्या कार्यकत्र्याना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर येथील तणाव निवळला. दोन्ही गटांच्या कार्यकत्र्यानी एकमेकांविरोधात पोलिसांकडे तक्रारी केलेल्या नाहीत. परिणामी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही, अशी माहिती परिमंडळ पाचचे उपायुक्त महेश पाटील यांनी दिली.
धुळीपासून
बचाव
मैदानातील धूळ अनुयायांसाठी त्रसदायक ठरत होती़ यामुळे संपूर्ण शिवाजी पार्क मैदान टर्फने (हिरवे गालिचे) झाकले होत़े पहिल्यांदाच करण्यात आलेल्या या प्रयोगामुळे धुळीचा त्रस यावेळी झाला नाही़
शौचालये वाढविली, तरी अपुरीच
उन्हातान्हातही चैत्यभूमीवर तासन्तास रांगेत उभ्या असलेल्या अनुयायांसाठी टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याची व फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती़ या वेळी फायबरच्या शौचालयांची संख्या वाढविण्यात आली होती़ परंतु अनुयायांची संख्या अधिक असल्याने गैरसोय कायम राहिली़