भीमसेन जोशी यांच्या मृत्युपत्रचा वाद हायकोर्टात
By admin | Published: July 23, 2014 02:29 AM2014-07-23T02:29:24+5:302014-07-23T02:29:24+5:30
भारतरत्न गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या मृत्युपत्रप्रकरणी सुरू असलेला वाद पुणो न्यायालयातून उच्च न्यायालयात दाखल झाला आह़े
Next
मुंबई : भारतरत्न गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या मृत्युपत्रप्रकरणी सुरू असलेला वाद पुणो न्यायालयातून उच्च न्यायालयात दाखल झाला आह़े जोशी यांची दहा कोटी रुपयांची मालमत्ता असून वीस म्युङिाक कंपन्यांची रॉयल्टीही आह़े या सर्वाचा लेखाजोखा असलेल्या मृत्युपत्रवरून गायक जोशी यांच्या दोन पत्नींच्या मुलांमध्ये वाद सुरू आह़े
यांपैकी गायक जोशी यांची पहिली पत्नी सुनंदा यांचा मुलगा राघवेंद्र यांनी वडिलांच्या मृत्युपत्रला पुणो न्यायालयात आव्हान दिल़े जोशी यांनी हे मृत्युपत्र 22 सप्टेंबर 2क्क्8 मध्ये तयार केले होत़े मात्र त्यावेळी जोशी हे शारीरीक व मानसिकरीत्या सक्षम नव्हत़े तसेच या मालमत्तेत आमचाही समान हक्क आहे, असा दावा राघवेंद्र यांनी पुणो न्यायालयात केला़ त्याची दखल घेत न्यायालयाने जोशी यांचा पुण्यातील कलाश्री बंगला व इतर मालमत्ता विकण्यास मनाई केली़
याविरोधात जोशी यांची दुसरी पत्नी वत्सला यांच्या मुलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आह़े हे मृत्युपत्र जोशी यांचेच असून ते तयार करत असताना जोशी यांची मानसिक व शारीरिक स्थिती उत्तम होती, असे याचिकेत नमूद करण्यात आले आह़े
या याचिकेवर न्या़ क़े क़े तातेड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ न्यायालयाने ही सुनावणी 11 ऑगस्टर्पयत तहकूब केली़ (प्रतिनिधी)