भिरा ४३; विदर्भाचा पारा ४२ अंशावर

By admin | Published: March 26, 2017 02:43 AM2017-03-26T02:43:11+5:302017-03-26T02:43:11+5:30

दोन दिवसांपासून वाढणारा तापमानाचा पारा शनिवारी आणखी वाढला. विदर्भात सर्वाधिक झळा बसत

Bhira 43; The mercury of Vidarbha is 42 degrees | भिरा ४३; विदर्भाचा पारा ४२ अंशावर

भिरा ४३; विदर्भाचा पारा ४२ अंशावर

Next

पुणे/नागपूर : दोन दिवसांपासून वाढणारा तापमानाचा पारा शनिवारी आणखी वाढला. विदर्भात सर्वाधिक झळा बसत असून उपराजधानी नागपुरातील तापमान ४२ अंश सेल्सिअसवर तर चंद्रपूरचा पारा ४२.२ अंशावर होता. सर्वात जास्त तापमान कोकणातील भिरा येथे ४३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.
ईशान्य मध्य प्रदेश ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत विदर्भ व मराठवाड्यातून जाणारे द्रोणीय क्षेत्र आता ईशान्य मध्य प्रदेश ते उत्तर कर्नाटकापर्यंत आहे़ त्यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भातील पारा वाढला आहे. विदर्भातील अनेक ठिकाणाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. विदर्भासाठी मार्च हा हवामान बदलाचा महिना असतो. त्यामुळे याच महिन्यापासून उन्हाळा जाणवायला सुरवात होते. यंदा तो थेट ४२ अंशावर पोहोचला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील तापमानातही वाढ झाली आहे़ विदर्भात सरासरीपेक्षा ३ ते ४़४ अंशाने तर मध्य महाराष्ट्रात १ ते ४़५ अंशाने वाढ झाली आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Bhira 43; The mercury of Vidarbha is 42 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.