Mucormycosis: भिवंडीत म्युकरमायकोसीसचा पहिला बळी; महापालिकेतील महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 04:49 PM2021-06-15T16:49:18+5:302021-06-15T16:50:12+5:30

Mucormycosis: भिवंडीत कोरोना संकट आटोक्यात आले असले, तरी म्युकरमायकोसीस आजाराने डोके वर काढले असून, भिवंडी महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसीस आजाराने मंगळवारी मध्यरात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

bhiwandi municipal corporation lady cleaning staff died due to mucormycosis | Mucormycosis: भिवंडीत म्युकरमायकोसीसचा पहिला बळी; महापालिकेतील महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू 

Mucormycosis: भिवंडीत म्युकरमायकोसीसचा पहिला बळी; महापालिकेतील महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू 

Next

नितिन पंडीत

भिवंडी:भिवंडीत कोरोना संकट आटोक्यात आले असले, तरी म्युकरमायकोसीस आजाराने डोके वर काढले असून, भिवंडी महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसीस आजाराने मंगळवारी मध्यरात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोना संकटात कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्याचाच म्युकरमायकोसीस आजाराने मृत्यू झाल्याने मनपा कर्मचाऱ्यांसह, परिवार व परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून भिवंडीत म्युकरमायकोसीस आजाराचा हा पहिलाच बळी असल्याचे समोर आले असून भिवंडी मनपा म्युकरमायकोसीस आजाराबाबत आता तरी खबरदारी घेणार का असा सवाल उपस्थित झाला आहे. 

दिपीका दिनेश घाडगे ( वय ४४ वर्ष ) असे म्युकरमायकोसीस आजाराने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या भिवंडी महापालिकेत प्रभाग पाच मध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. मागील चार दिवसांपूर्वी त्यांना म्युकरमायकोसीस आजाराची लक्षणे आढळल्याने त्यांना सुरुवातीला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनतर पुढील उपचारासाठी मुंबई येथील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील सेंट जोर्जेस रुग्णालयात हलविण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरु असतांना मंगळवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांच्या पश्चात पती, दोन मुले एक मुलगी व वृद्ध सासू असा परिवार आहे. 

दरम्यान राज्यासह जिल्ह्यात म्युकरमायकोसीस आजाराचे रुग्ण वाढले असतांनाही भिवंडी महापालिका क्षेत्रात म्युकरमायकोसीस आजाराचे रुग्ण नव्हते. यापूर्वी म्युकरमायकोसीस या आजाराचा फक्त एकच रुग्ण आढळला असल्याची माहिती मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ के आर खरात यांनी दिली आहे. तर दुसरीकडे मनपाच्या महिला सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यू नंतर तरी भिवंडी मनपा म्युकरमायकोसीस आजारावरील उपचारासाठी उपाययोजना कारणार का असा सवाल उपस्थित होत आहे. 
 

Web Title: bhiwandi municipal corporation lady cleaning staff died due to mucormycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.