भिवंडीत शाळेचे सिलिंग कोसळले
By admin | Published: July 23, 2014 04:05 AM2014-07-23T04:05:01+5:302014-07-23T04:05:01+5:30
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक 57लगत असलेल्या माध्यमिक विभागाच्या तेलगू माध्यमाच्या 8वीच्या वर्गातील छताचे प्लास्टर कोसळून 32 मुले जखमी झाली.
Next
भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक 57लगत असलेल्या माध्यमिक विभागाच्या तेलगू माध्यमाच्या 8वीच्या वर्गातील छताचे प्लास्टर कोसळून 32 मुले जखमी झाली. ही घटना मंगळवारी सकाळी 1क्च्या सुमारास शाळा सुरू असताना घडली. या घटनेने परिसरातील नागरिकांनी पालिकेविरोधात संताप व्यक्त केला आहे.
मंगळवारी सकाळी 7 वाजता नियमित शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षिका अरुणा सामला यांचे शिकविणो सुरू असताना 1क्च्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्याचवेळी अचानक आठवीच्या वर्गातील चालू पंख्यासहित प्लास्टर विद्याथ्र्याच्या अंगावर कोसळले. फिरत्या पंख्याच्या पातीने जास्त मुले जखमी झाल्याची माहिती सूत्रंनी दिली. या घटनेत 32 मुले जखमी झाली. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले असून, त्यापैकी 22 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 1क् जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. दिनेश पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)