‘भावोजी’ ठाण्याच्या मोहिमेवर?

By admin | Published: April 6, 2016 04:13 AM2016-04-06T04:13:20+5:302016-04-06T04:13:20+5:30

शिवसेनेत सध्या इनकमिंग जोरात सुरु असून भाजपा, मनसे अथवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्टांना पक्षात आणण्याच्या मोहिमेत भावोजी अर्थात आदेश बांदेकर हे आघाडीवर आहेत

'Bhojoji' Thane campaign? | ‘भावोजी’ ठाण्याच्या मोहिमेवर?

‘भावोजी’ ठाण्याच्या मोहिमेवर?

Next

ठाणे : शिवसेनेत सध्या इनकमिंग जोरात सुरु असून भाजपा, मनसे अथवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्टांना पक्षात आणण्याच्या मोहिमेत भावोजी अर्थात आदेश बांदेकर हे आघाडीवर आहेत. ठाण्यातील फोडाफोडी ही सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यावर आतापर्यंत होत आली असली तरी बांदेकर यांना ठाण्याच्या मोहिमेवर धाडले जाण्याची कुजबुज शिवसेनेच्या गढीत सुरु आहे.
बांदेकर हे शिवसेनेचे सचिव असून गेल्या काही दिवसांत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन केला आहे. बांदेकर यांना ग्लॅमर असल्याने वेगवेगळ््या पक्षातील असंतुष्टांना भावोजींचा फोन गेला की, त्यांच्या होम मिनिस्टरही भावोजींच्या स्वागताकरिता हातात तबक घेऊन उभ्या राहतात. बांदेकर यांच्या वेगवेगळ््या पक्ष फोडण्याचा शिवसेनेतील काही नेते व विभागप्रमुख यांनी इतका धसका घेतला की, सध्या अन्य पक्षातून असंतुष्ट आणून त्यांना उद्धव यांच्या पायावर घालण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.
ठाण्यातील शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांची पकड असून त्यांच्या मंजुअजित मांडके ल्ल ठाणे
ठाणे पालिका पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यातील राष्ट्रवादीत थोडी तरी धुगधुगी निर्माण होईल, अशी आशा निर्माण होत असतानाच अपक्ष असूनही बिनविरोध होण्याचा मान पटकावलेल्या देवराम भोईरांच्या निमित्ताने शिवसेनेने एकाच वेळी आघाडीत काडी घातली आहे आणि भाजपाच्या राजकारणालाही जोर का झटका दिला आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जबाबदाऱ्यांत खांदेपालट करत भाजपाने पहिले पाऊल टाकले होते. विधानसभा, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांत ज्याप्रमाणे निवडून येण्याची क्षमता असलेले इतर पक्षांतील उमेदवार फोडून आपल्या पक्षात घेतले होते, त्याच पद्धतीने याही वेळी चाचपणी सुरू होती. मात्र, शिवसेनेने घाई करत भोईर यांच्या रूपाने भाजपालाही धक्का दिला. यातही, आजवर होणारहोणार म्हटला जाणारा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील बेबनाव या निवडणुकीनिमित्ताने समोर आल्याने युती तर नाहीच, पण आघाडीही विसविशीत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
आधीच परमार प्रकरणामुळे ठाण्यात आणि राज्य पातळीवर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर पोलीस कोठडीत जाण्याची वेळ आल्याने सर्वच स्तरांवर सध्या राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळली आहे. देवराम भोईरांच्या निमित्ताने ठाण्यातील राष्ट्रवादीला एक वेगळी उंची मिळण्याची आशा होती. तीही फोल ठरण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीतर्फे त्यांनी भरलेला अर्ज मागे घेतानाच त्यांच्यासाठी शिवसेनेसोबत काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनाही माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त झाले. भोईर शिवसेनेच्या वाटेवर... अशी चर्चा सुरू झाली. रीखेरीज कुणी शिवसेनेत प्रवेश करु शकत नाही. देवराम भोईर यांना शिवसेनेच्या जवळ आणून त्यांनी आपले हे कौशल्य दाखवून दिले आहे. मात्र कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपाने फोडाफोडी करून शिवसेनेला शह देण्याचा व आपली ताकद वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याचीच पुनरावृत्ती ठाण्यात भाजपाकडून केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या प्रयत्नांना शह देण्याकरिता भावोजी यांनाही फोडाफोडीच्या खेळात उतरवण्याचा विचार शिवसेनेच्या उच्चपदस्थ वर्तुळात सुरु असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या आडून सेनेचा भाजपाला धक्का

Web Title: 'Bhojoji' Thane campaign?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.