दिलीप कांबळे यांना भोवला दारू परवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 04:57 AM2019-06-17T04:57:13+5:302019-06-17T04:57:27+5:30
पुणे : सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात विरोधी पक्षांच्या हातात कोलीत मिळू नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहता ...
पुणे : सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात विरोधी पक्षांच्या हातात कोलीत मिळू नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहता आणि दिलीप कांबळे यांचा राजीनामा घेतला़ दारु दुकानाच्या परवान्यासाठीच्या प्रकरणात आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा आरोप झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते़ हे आदेशच त्यांना भोवले आहेत.
वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ९२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चौघांवर सिडको पोलीस ठाण्यात मार्चमध्ये गुन्हा दाखल झाला आहे़ त्यामुळे विरोधकांनी दिलीप कांबळे यांच्या राजीनाम्याची मागणी करुन त्यांना अटक करावी, असा आग्रह धरला होता.
अधिवेशनात त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली असती. विरोधकांना सरकारवर टीका करण्याची संधी मिळू नये, म्हणून त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे़