मुंबईत नौदल भरतीवेळी भोंगळ कारभार, चेंगराचेंगरीत तरुण जखमी

By admin | Published: September 9, 2016 09:32 AM2016-09-09T09:32:41+5:302016-09-09T09:36:37+5:30

मालाड परिसरात नौदल भरतीसाठी आलेल्या तरुणांना भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. भरतीआधी चेंगराचेंगरी झाली असून अनेक परीक्षार्थी जखमी झाले आहेत

In Bhopal, Naval recruitment of young people injured in stampede | मुंबईत नौदल भरतीवेळी भोंगळ कारभार, चेंगराचेंगरीत तरुण जखमी

मुंबईत नौदल भरतीवेळी भोंगळ कारभार, चेंगराचेंगरीत तरुण जखमी

Next
- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - मालाड परिसरात नौदल भरतीसाठी आलेल्या तरुणांना भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. भरतीआधी चेंगराचेंगरी झाली असून अनेक परीक्षार्थी जखमी झाले आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे. भरतीवेळी विद्यार्थ्यासाठी खाण्या-पिण्याची काहीच सोय करण्यात आली नव्हती. 
 
गेल्या दोन दिवसांपासून हजारो तरुण मालाडच्या मार्वेमध्ये असलेल्या ‘आयएनएस हमला’मध्ये भरतीसाठी आले आहेत. आयएनएल हमला हे मुंबई समुद्रकिनाऱ्यावर सैन्यदलाचं तळ आहे. आज सकाळी अचानक चेंगराचेंगरी झाली ज्यानंतर झालेल्या धावपळीत अनेक तरुण दबल्याने जखमी झाले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार नौदलाने दिलेल्या जाहिरातीत फक्त 12 वी विज्ञान उत्तीर्ण अशीच पात्रता दिली असताना ऐनवेळी फक्त 60 टक्के पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या युवकांनाच प्रवेश दिला जात असल्याने तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी हलका लाठीचार्जदेखील केला असल्याचं कळत आहे. नाराज तरुणांनी संताप व्यक्त केला असून याबाबत कुणीही जबाबदार अधिकारी आपल्याशी संपर्क साधत नसल्याचा आरोप तरुणांनी केला आहे.
 

Web Title: In Bhopal, Naval recruitment of young people injured in stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.