भुजबळांनी पुन्हा लिहिले तुरुंगातून पत्र
By admin | Published: April 12, 2016 02:59 AM2016-04-12T02:59:28+5:302016-04-12T02:59:28+5:30
महात्मा जोतिबा फुले यांची यंदा १२५ वी पुण्यतिथी आहे. मात्र, या शतकोत्तर रौप्यस्मृतीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत सध्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले माजी उपमुख्यमंत्री
मुंबई : महात्मा जोतिबा फुले यांची यंदा १२५ वी पुण्यतिथी आहे. मात्र, या शतकोत्तर रौप्यस्मृतीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत सध्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हे १२५ वे जयंती वर्ष आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रम होत आहेत हे स्वागतार्हच आहे. मात्र, महात्मा फुले यांच्या शतकोत्तर रौप्यस्मृती वर्षाकडे दुर्लक्ष करणे हा पुरोगामी विचारांचा अपमान असल्याचे पत्रात म्हटले आहे. महात्मा फुले समता परिषदेने आपल्याला निवेदन दिलेले असून राज्य शासनाने या वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. (विशेष प्रतिनिधी)