भुजबळ चौकशी अहवाल पुढच्या आठवड्यात
By admin | Published: March 1, 2015 01:22 AM2015-03-01T01:22:42+5:302015-03-01T01:22:42+5:30
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांच्या चौकशीचा अंतरिम अहवाल शनिवारी उच्च न्यायालयात सादर होणे अपेक्षित होते़
मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांच्या चौकशीचा अंतरिम अहवाल शनिवारी उच्च न्यायालयात सादर होणे अपेक्षित होते़ मात्र शनिवारी न्यायालयाला सुट्टी असल्याने हा अहवाल सादर झाला नाही़ पुढच्या आठवड्यात हा अहवाल सादर होणे अपेक्षित आहे़
याप्रकरणी आपच्या अंजली दमानिया यांनी जनहित याचिका केली आहे़ दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकामात भुजबळ यांनी घोटाळा केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने याची चौकशी करण्यासाठी एसीबी व ईडीचे संयुक्त पथक नेमले़ याविरोधात भुजबळ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली़ मात्र सर्वोच्च न्यायालयानेही भुजबळ यांचे म्हणणे मान्य केले नाही़ त्यानंतर या पथकाने भुजबळ कुटुंबियांची चौकशी सुरू केली़ शेवटचा प्रयत्न म्हणून आमदार पंकज भुजबळ यांनी उच्च न्यायालयातच नव्याने अर्ज करून संयुक्त पथक नेमण्याच्या आदेशाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारा अर्ज केला़ तो अर्जही न्यायालयाने फेटाळला़ (प्रतिनिधी)