भुजबळांवरील उपचार; रुग्णालयाचे सरकारला पत्र

By admin | Published: November 15, 2016 06:07 AM2016-11-15T06:07:44+5:302016-11-15T06:07:44+5:30

माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची अ‍ॅन्जिओग्राफी आणि अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांंनी निदान केले आहे

Bhujbal treatment; Letter to the hospital government | भुजबळांवरील उपचार; रुग्णालयाचे सरकारला पत्र

भुजबळांवरील उपचार; रुग्णालयाचे सरकारला पत्र

Next

मुंबई : माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची अ‍ॅन्जिओग्राफी आणि अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांंनी निदान केले आहे. यासंदर्भात बॉम्बे रुग्णालयाने सरकारला पत्र दिले असून उत्तर आल्यावर प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. बी.के. गोयल यांनी दिली.
छगन भुजबळ यांंच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकार असून केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन त्यांचा २४ तासांचा इसीजी केला. त्यानंतर भुजबळांना बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी त्यांच्या थॅलियम सीटी स्कॅन आणि इलेक्ट्रो फिजिलॉजी स्टडी या दोन तपासण्या करण्यात आल्या. याचबरोबरीने त्यांच्या अन्य काही तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांनंतर अ‍ॅन्जिओग्राफी आणि अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याची आवश्यकता असल्याचे निदान झाले. यासंदर्भात सरकारला पत्र पाठविले आहे. सध्या त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातच उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असेही डॉ. गोयल यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Bhujbal treatment; Letter to the hospital government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.