भुजबळांची २०.४१ कोटींची मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:24 AM2017-12-06T04:24:03+5:302017-12-06T04:24:48+5:30

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व इतरांवरील हवाला व्यवहारांच्या चौकशीत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २०.४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवा आदेश जारी केला आहे.

Bhujbal's assets worth Rs 20.41 crore were seized | भुजबळांची २०.४१ कोटींची मालमत्ता जप्त

भुजबळांची २०.४१ कोटींची मालमत्ता जप्त

Next

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व इतरांवरील हवाला व्यवहारांच्या चौकशीत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २०.४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवा आदेश जारी केला आहे. आजपर्यंत या प्रकरणांत एकूण १७८ कोटींची मालमत्ता जप्त झाली.
दिल्लीतील महाराष्टÑ सदनाचे बांधकाम आणि मुंबईतील कलिना येथील एका जमीन व्यवहारात भुजबळ यांनी मिळविलेली कोट्यवधी रुपयांची लाच बोगस कंपन्यांच्या माध्यमातून अन्यत्र वळविली. या बेनामी मालमत्ता प्रकरणात गेल्या वर्षी भुजबळ यांना ईडीने अटक केली. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. याच प्रकरणात भुजबळ यांचा मुलगा व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पंकज आणि पुतण्या समीर हेदेखील आरोपी आहेत. भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी मिळवलेली लाच इतरत्र वळवण्यासाठी कुटुंबीयांनी कट केला, असे ईडीचे म्हणणे आहे.
याचिकेवर युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयाने प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) कायद्यातील कलम ४५ रद्द केल्याने भुजबळ यांनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज सादर केलेला आहे. या अर्जावर ईडीने आक्षेप घेतला. भुजबळांना सर्व संपत्तीचा हिशेब द्यावा लागेल, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत, आपल्या ताब्याची आवश्यकता आहे की नाही, हे जाणून आपला जामीन मंजूर करावा, अशी विनंती भुजबळांनी न्यायालयाला केली होती.

Web Title: Bhujbal's assets worth Rs 20.41 crore were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.