भुजबळांच्या कंपनीला सहा कोटी रुपये

By admin | Published: April 13, 2016 02:21 AM2016-04-13T02:21:03+5:302016-04-13T02:21:03+5:30

घराला रंग देण्याचा खर्च काही हजारांचा असला, तरी सामान्य माणूस स्वस्तात काम करून घेण्यासाठी कंत्राटदाराशी बरीच चर्चा करतो, परंतु के. एस. चमणकर एन्टरप्रायजेसने भुजबळांनी

Bhujbal's company is worth six crores | भुजबळांच्या कंपनीला सहा कोटी रुपये

भुजबळांच्या कंपनीला सहा कोटी रुपये

Next

- डिप्पी वांकाणी,  मुंबई
घराला रंग देण्याचा खर्च काही हजारांचा असला, तरी सामान्य माणूस स्वस्तात काम करून घेण्यासाठी कंत्राटदाराशी बरीच चर्चा करतो, परंतु के. एस. चमणकर एन्टरप्रायजेसने भुजबळांनी स्थापन केलेल्या बनावट कंपनीला कोणत्याही वाटाघाटी न करता सहा कोटी रुपये अदा केले. भुजबळांनी ही कंपनी रक्कम घेण्यासाठी स्थापन केली होती आणि चमणकरांनी विकत घेतलेल्या फर्निचरचे हे पैसे दिले, असा हा व्यवहार दाखविण्यात आला होता. अशा प्रकारचा ‘व्यावसायिक व्यवहार’ कधी झाला नव्हता, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आरोपपत्रात म्हटले आहे.
चमणकर एन्टरप्रायजेसने फर्निचरमध्ये काहीही बदल केलेला नसताना ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरने दिलेल्या अंदाजपत्रकाबाबत (इस्टिमेट) वाटाघाटी केल्या नाहीत. गुगलवर सर्च केलेले ‘स्क्रीनशॉट्स’ व्हिजिटिंग कार्ड्स आणि बीटूबी आॅनलाइन पोर्टलचा तपशील आरोपपत्रासोबत जोडण्यात आला आहे. भुजबळांनी हवाला व्यवहारासाठी इदिन फर्निचर ही बनावट कंपनी कशी स्थापन केली, हे सिद्ध करण्यासाठी हा तपशील जोडण्यात आला आहे. इदिन फर्निचरचा पत्ता वांद्र्याच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या (एमईटी) कार्यालयातील आठव्या मजल्याचा देण्यात आला होता.
एमईटीचा अकाउंटंट संजय जोशी आणि तन्वीर शेखची पत्नी इराम शेख हे एमईटीचे कर्मचारी होते. त्यांना डिसेंबर २००७ ते आॅगस्ट २००८ या कालावधीत ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक दाखविण्यात आले. चमणकर एन्टरप्रायजेसने ६७.७१ लाख रुपये सारस्वत को. आॅपरेटिव्ह बँकेच्या वडाळा शाखेत कंपनीच्या खात्यात भरले. सप्टेंबर २०१० ते मार्च २०१३ या कालावधीत ६,०३,६९,३८० रुपये त्याच खात्यात भरण्यात आले आणि हे पैसे दिल्लीतील महाराष्ट्र सदनला फर्निचरचा पुरवठ्यासाठी असल्याचे दाखविले. ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरने दिलेली अंदाजपत्रके आणि त्यांना मिळालेले पेमेंट यांच्यात फरक नाही, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

Web Title: Bhujbal's company is worth six crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.