भुजबळांच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ
By admin | Published: April 1, 2016 02:00 AM2016-04-01T02:00:29+5:302016-04-01T02:00:29+5:30
महाराष्ट्र सदन घोटाळ््याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ््याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री पदाचा गैरवापर करत प्रत्येक कंत्राट देताना लाच स्वीकारल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीला सुमारे ८८० कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी १४ मार्च रोजी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली. विशेष प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रींग अॅक्ट (पीएमएलए) न्यायालयाने त्यांना १७ मार्च रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली. ३१ मार्चला ही कोठडीची मुदत संपत असल्याने गुरुवारी भुजबळ यांना विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ केली. (प्रतिनिधी)