भुजबळांची तुरुंगातील रात्र गेली शांततेत
By Admin | Published: March 19, 2016 02:26 AM2016-03-19T02:26:55+5:302016-03-19T02:26:55+5:30
आर्थर रोडमध्ये गुरुवारी रवानगी झालेल्या छगन भुजबळांची तुरुंगातील गुरुवारची रात्र शांतपणे गेली. त्यांना रात्री फारशी झोप मात्र लागली नाही. त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि तुरुंगातील
- डिप्पी वांकाणी, मुंबई
आर्थर रोडमध्ये गुरुवारी रवानगी झालेल्या छगन भुजबळांची तुरुंगातील गुरुवारची रात्र शांतपणे गेली. त्यांना रात्री फारशी झोप मात्र लागली नाही. त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि तुरुंगातील कैद्यांना जे काही दिले जाणारे जेवणच ते जेवले, आम्ही त्यांना समीर भुजबळपासून दूर असलेल्या जागी ठेवले आहे, असे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.
त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘लोकमत’ला सांगितले की सध्या तरी आम्ही भुजबळांना घरचे जेवण आणि किंवा औषधे देण्यासाठी अर्ज करणार नाही. मात्र भुजबळांना जामीन मिळण्यासाठी कधी अर्ज करायचा यावर वकिलांची चर्चा सुरू आहे. हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्ज करताना आरोपी कसा दोषी नाही याचे पुरावे द्यावे लागतात. त्यामुळे एकदा चौकशी यंत्रणेकडून आरोपपत्र दाखल झाले की जामिनासाठी अर्ज करणे शहाणपणाचे ठरेल. परंतु ताबडतोब अर्ज करावा का यावर आम्ही विचार करीत आहोत.
मात्र, भुजबळ यांना मिळालेली न्यायालयीन कोठडी ही चौकशीला वरदानच ठरली आहे, असे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यांचा पुतण्या समीर याला आणल्यावर सगळा दोष तो स्वत:वर घेईल, अशी आम्हाला भीती होती त्यामुळे या दोघांना एकमेकांसमोर आणण्यात आले नाही. ईडीच्या खूप महत्त्वाच्या साक्षीदारांनी जे पुरावे या प्रकरणात दिले आहेत त्यामुळे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ असे दोघेही त्यात दोषी ठरू शकतील, असे हा अधिकारी म्हणाला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या माहितीनुसार सध्या वकिलांच्या तुकडीसोबत बैठका सुरू आहेत. या प्रकरणात छगन भुजबळांच्या जामिनासाठी नेमका कधी अर्ज करावा यावर मोठी चर्चा सुरू आहे.
भुजबळांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे आम्हाला एक पाऊल मागे यावे लागले असे आम्ही समजत नाही. समीर व भुजबळ समोरासमोर आल्यावर आणखी काही पुरावे समोर येऊ शकतील. साक्षीदारांच्या निवेदनामुळे आमची बाजू बळकट झाली आहे. पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अंतर्गत दिले गेलेले निवेदन हे ग्राह्य धरले जाते आणि त्याचे मोल हे दिवाणी न्यायालयात केलेल्या निवेदनाएवढे असते, ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले.
- समीर व भुजबळ समोरासमोर आल्यावर आणखी काही पुरावे समोर येऊ शकतील.
साक्षीदारांच्या निवेदनामुळे आमची बाजू बळकट झाली आहे. पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अंतर्गत दिले गेलेले निवेदन हे ग्राह्य धरले जाते आणि त्याचे मोल हे दिवाणी न्यायालयात केलेल्या निवेदनाएवढे असते, ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले.