भुजबळांची १६० कोटींची जमीन ईडीच्या ताब्यात

By admin | Published: November 14, 2015 03:56 AM2015-11-14T03:56:25+5:302015-11-14T03:56:25+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर हे संचालक असलेल्या हेक्स वर्ल्ड या कंपनीच्या १६० कोटींच्या खारघरस्थित जमिनीवर सक्तवसुली संचानालयाच्या

Bhujbal's land worth 160 crores | भुजबळांची १६० कोटींची जमीन ईडीच्या ताब्यात

भुजबळांची १६० कोटींची जमीन ईडीच्या ताब्यात

Next

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर हे संचालक असलेल्या हेक्स वर्ल्ड या कंपनीच्या १६० कोटींच्या खारघरस्थित जमिनीवर सक्तवसुली संचानालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी टाच आणली. हा भुजबळांना जबर हादरा मानला जात आहे.
देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रवर्तक असलेल्या या जमिनीची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार १६० कोटींच्या घरात जाते, असे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. ७१ कोटी रुपयांत खरेदी केलेल्या या जमिनीवर हेक्स वर्ल्डचा गृहप्रकल्प उभारण्यात येणार होता. यासाठी पैैसा कसा आला, याचा छडा लावण्यात आला असून मुंबई आणि इतर ठिकाणीही, लवकरच अशा प्रकारची जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
२०१०मध्ये १० टक्के अ‍ॅडव्हान्स रक्कम देऊन २३०० लोकांनी या प्रकल्पातील घरांसाठी बुकिंग केली होती. तथापि, वादामुळे २०१४पर्यंत या प्रकल्पाच्या कामात काहीच प्रगती झाली नाही. परिणामी हे प्रकरण कोर्टात गेले. या प्रकल्पासाठी गुंतवणुकदारांकडून २५ कोटी रुपये उभे करण्यात आले, तर उर्वरित पैैसा अन्य मार्गाने उभा करण्यात आला, असेही ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तळोजा पोलिसांनी १३ जून रोजी एफआयआर दाखल केल्यानंतर १७ जून रोजी ईडीने समीर आणि पंकज भुजबळ तसेच अन्य तिघांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये ईसीआयआर (एन्फोर्समेन्ट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट) दाखल केला होता. (विशेष प्रतिनिधी)
भुजबळांचे वकील अ‍ॅड. सजल यादव यांनी या घडामोडीबाबत सांगितले की, कोणत्याही जप्तीबाबत आम्हाला सूचना मिळालेली नाही. ईडीला आम्ही फक्त दस्तावेज दिले होते.
व्यावसायिक प्रतिस्पर्धीच्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेली जप्तीची कारवाई बेकायदेशीर असून योग्य ती कारवाई केली जाईल.
महाराष्ट्र सदन बांधकाम आणि कलिना
सेंट्रल लायब्ररी प्रकरणाचीही ईडी चौकशी
करीत आहेत.
या दोन्ही घोटाळ्यांमुळे सरकारचे ८६८.६६ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असे ईडीने ईसीआयआरमध्ये म्हटले आहे.
सप्टेंबरमध्येही ईडीने महाराष्ट्र सदन प्रकरणात चमणकर एंटरप्रायजेसची मुंबईतील १७.३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

Web Title: Bhujbal's land worth 160 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.