भुजबळांवर मनी लाँड्रींगचा संशय
By Admin | Published: June 19, 2015 02:35 AM2015-06-19T02:35:12+5:302015-06-19T02:35:12+5:30
महाराष्ट्र सदन प्रकल्पात टक्केवारीसाठी वापरलेले ७.२९ कोटी रुपये हे काम करणाऱ्या कंपनीला परत करण्याचा विचार माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला
डिप्पी वांकाणी , मुंबई
महाराष्ट्र सदन प्रकल्पात टक्केवारीसाठी वापरलेले ७.२९ कोटी रुपये हे काम करणाऱ्या कंपनीला परत करण्याचा विचार माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला असावा व या प्रकल्पासाठी लाच देण्यासाठी खासगी व्यक्तीने तेच पैसे वापरले असावेत, असा दाट संशय असल्याने याची तपासणी सक्त वसुली संचालनालय (ईडी) करीत आहे.
महाराष्ट्र सदनाचे कंत्राट घेणाऱ्या चमणकर एंटरप्राईज या कंपनीची तसेच रॉयल एंटरप्राईज व राजेश मिस्त्री यांचीही चौकशी करणार आहोत असे ईडी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आम्हाला तर मनी लाँड्रींगचा संशय असून लवकरच वस्तुस्थिती जाणून घेऊ, असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ईडीचे अधिकारी रॉयल एन्टरप्राईजच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत. रॉयल एन्टरप्राईज कंपनीनेच ९ कोटी रुपये पाठविले होते व त्यातील ३.१७ कोटी रुपये निश इन्फ्रास्ट्रक्चर या भुजबळ कुटुंबाच्या तसेच राजेश मिस्त्री यांच्या बनावट कंपनीने परत केले. राजेश मिस्त्री याने ४.५ कोटी रु पाठविले व ४.१२ कोटी रुपये परत केले. हे पैसे त्यांनी परत केले असते तरीही आम्ही या कंपनीची चौकशी केलीच असती. कारण त्यांनी मुळात हे पैसे दिलेच का, असा प्रश्न निर्माण झाला असता. मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे (एमईटी) संजय जोशी व इरम शेख (एमईटीचे कर्मचारी तन्वीर शेख या कर्मचाऱ्याची पत्नी) यांच्या ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर या बनावट कंपनीच्या खात्यात चमणकर ट्रस्टने ०७ डिसे. २००७ ते ९ मे २०११ दरम्यान ३ कोटी ६७ लाख ७१ हजार ६०१ रुपये टाकले.
ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरने याबदल्यात १२/०२/२०१० ते २०/०१/२०१२ दरम्यान ७४ लाख १० हजार २९१ रुपये इदीन फर्निचर्सला दिले. विशाखा पंकज भुजबळ व शेफाली समीर भुजबळ इदीन फर्निचर्सचे संचालक आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक खाते यातील भ्रष्टाचाराच्या भागाकडे लक्ष देईल पण आम्ही यातील पैशांचा मार्ग (स्रोत)कोणता हे पाहणार आहोत.
मूळ कंत्राट दिले दुसऱ्याला
रॉयल एन्टरप्राईज ही कंपनी विपुल काकरिया व सुभाष कोटदिया भागीदारीत चालवतात. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेला उज्ज्वल काकरिया हा विपुलचा भाऊ आहे. उज्ज्वल हा राजेश मिस्त्रीचा सीए आहे. रॉयल एंटरप्रायजेसचा हार्मोनी इन्व्हेस्टमेंट ग्रुपशी व्यवसाय होता. हा ग्रुप धनपत सेठ व शैलेश मेहता चालवायचे. सेठ व मेहता प्राईम बिल्डर्स ग्रुपही चालवायचे. बांधकामाचे मूळ कंत्राट चमणकर एंटरप्रायजेसला मिळालेले असताना चमणकर एंटरप्रायजेसने ते प्राईम बिल्डर्स ग्रुपला दिले.
ओरिजन इन्फ्रास्ट्रक्चर
संचालक :
संजय जोशी (मुंबई एज्यु.
ट्रस्टचे (एमईटी) कर्मचारी)
इरम शेख (एमईटीचे कर्मचारी
तन्वीर शेख यांची पत्नी)
चमणकर इंटरप्रायजेस ते
ओरिजन इन्फ्रास्ट्रक्चर :
७/१२/२००७ : १५०००००
३१/०१/२००८ : ५०००००
२८/०२/२००८ : १९५४६८०
२३/०८/२००८ : २८१६९२१
०७/०५/२०११ : ३०००००००
एकूण : ३,६७७१६०१
इदीन फर्निचर्स :
संचालक :
विशाखा पंकज भुजबळ
शेफाली समीर भुजबळ
ओरिजिकडून
इदीन फर्निचर्सकडे
१२/१२/२००८-४२९२६७
०५/०२/२००९ -५०००००
१६/१०/२०१०- ५०००००
०३/०२/२०११ -१८१०२४
०९/०३/२०११- १०००००
१५/०३/२०११- २०००००
१४/०५/२०११ -१००००००
११/०६/२०११-१००००००
१०/०८/२०११- १००००००
०६/०९/२०११-३०००००
२९/०९/२०११-१२०००००
२०/०१/२०१२-१००००००
एकूण : ७४१०२९१
निश इन्फ्रास्ट्रक्चर
संचालक : पंकज भुजबळ, समीर भुजबळ, तन्वीर शेख,
गीता जोशी(संजय जोशींची पत्नी)
रॉयल इंटरप्रायजेस
ते निश इन्फ्रास्ट्रक्चर
२९/०४/२००८ : ५०००००००
०९/०५/२००८ : २०००००००
१५/०५/२००८ : २०००००००
परत
०८/०६/२००९ : ११७०००००
२२/०६/२००९ :२०००००००
राजेश मिस्त्रीकडून
निश इन्फ्रास्ट्रक्चर
२३/०५/२००८-२५००००००
२६/०८/२००८-१०००००००
२७/०८/२००८-१०००००००
परत
०८/०४/२००९-३८०००००
११/०४/२००९-२१०००००
१८/०४/२००९-२१०००००
१४/०५/२००९-२२०००००
०४/०६/२००९-१०००००००
०५/०६/२००९-२१००००००
चमणकर इंटरप्रायजेसकडून ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर
७/१२/०७-९/५/११
३,६७,७१,६०१
ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चरकडून
इदीन फर्निचर्स
१२/२/१०-२०/०१/१२
७४,१०,२९१
राजेश मिस्त्रीकडून नीचे इन्फ्रास्ट्रक्चर
२५/०५/२०१०-२७/०८/२०१०
४.५ कोटी
रॉयल
इंटरप्रायजेस
२९/०४/२००८-१९/०५/२००८
९ कोटी
एप्रिलंते मे २००८ मध्ये रॉयल एन्टरप्राईजने ९ कोटी रुपये निश इन्फ्रास्ट्रक्चरच्या खात्यात भरले केले. पंकज व समीर भुजबळ हे निश इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक आहेत. मे २००८ ते आॅगस्ट २००८ दरम्यान राजेश मिस्त्री याने निश इन्फ्रास्ट्रक्चरच्या खात्यात ४.५ कोटी रुपये जमा केले.
रॉयल एन्टरप्राईज व राजेश मिस्त्री यांचा वापर मुख्य विकासकातर्फे बांधकाम करणाऱ्या कंपनीला लाच देण्यासाठी करण्यात आला. पैसे अशा पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आले की विकासकाचे नाव कोठेही येऊ नये, असा अंजली दमानिया यांचा आरोप आहे. दमानिया सध्या सुटीसाठी जिनिव्हात आहेत.