भुजबळांच्या संस्थेचा भूखंड अखेर सरकारजमा
By admin | Published: June 2, 2016 03:13 AM2016-06-02T03:13:08+5:302016-06-02T03:13:08+5:30
शैक्षणिक प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या शासकीय जमिनीचा मुदतीत वापर न केल्याने शासकीय नियमानुसार जागा सरकारजमा करण्याच्या निर्णयाविरुद्ध, राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे
नाशिक : शैक्षणिक प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या शासकीय जमिनीचा मुदतीत वापर न केल्याने शासकीय नियमानुसार जागा सरकारजमा करण्याच्या निर्णयाविरुद्ध, राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी केलेले अपील फेटाळण्यात आल्यामुळे नाशिक तालुक्यातील गोवर्धन शिवारात भुजबळ यांच्या शैक्षणिक संस्थेला दिलेला भूखंड सरकार जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट या संस्थेस गोवर्धन शिवारातील ४.१३ हेक्टर जमीन २००४ मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर, भुजबळ यांनी पुन्हा शासनाकडे शैक्षणिक संस्थेच्या विस्तारीकरणासाठी वाढीव जागेची मागणी केल्याने हा प्रश्न अनेक वर्षे सरकार दरबारी प्रलंबित राहिला.