जामीन मंजूर होऊनही भुजबळांचा मुक्काम तुरूंगातच
By admin | Published: June 22, 2016 02:02 PM2016-06-22T14:02:02+5:302016-06-22T18:58:43+5:30
महाराष्ट्र सदन आणि कलिना विद्यापीठ लायब्ररी घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना एसीबीच्या विशेष कोर्टाकडून जामीन मंजूर
Bail granted to Chhagan Bhujbal & Sameer Bhujbal by the ACB court on bond of Rs 50,000 in Maharashtra Sadan and Kalina land allotment case.
— ANI (@ANI_news) June 22, 2016महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावले होते. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका-यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली होती. १४ मार्चला ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती. ते उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती देऊ न शकल्याने आणि चौकशीमध्ये सहकार्य करीत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
- भुजबळ यांना त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रक्कम कुठून आली असे ईडीतर्फे विचारण्यात आले. मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये हा पैसा गुंतविण्यात आला, असा आरोप आहे. रोख रक्कम रुग्णवाहिकांमध्ये ठेवण्यात आली होती. नंतर ती मटक्याच्या धंद्यातील हवाला आॅपरेटरकडे नेण्यात आली, कोलकात्याच्या कंपन्या आणि हवाला व्यवहार करणाऱ्याने आपापली भूमिका मान्य केल्यानंतरही हा पैसा कुठून आला हे समीर व पंकज सांगू शकलेले नाहीत. हा पैसा आला कुठून हे शोधून काढण्यासाठी आम्ही चौकशी करीत आहोत, असे सूत्रांनी म्हटले.
- भुजबळ यांनी हवाला आॅपरेटरला यात ओढले का आणि ज्या बनावट कंपन्यांनी धनादेश दिले त्यांच्याशी या आॅपरेटरने मध्यस्थी केली का याची आम्ही खातरजमा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. समीर आणि पंकज यांना असे व्यवहार मार्गदर्शनाशिवाय व भुजबळ यांच्याकडील पैशांशिवाय करणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. समीर आणि पंकज यांच्या कोणत्याही कंपन्यांमध्ये भुजबळ संचालक नव्हते. महाराष्ट्र सदन आणि कालिना सेंट्रल लायब्ररीच्या बांधकामाचे कंत्राट देण्यासाठी छगन भुजबळ यांनी कंत्राटदाराकडून लाच म्हणून ही रक्कम घेतल्याचा आरोप आहे.
भुजबळ कुटुंबावर झालेली कारवाई
१२ डिसें.२०१५ : ईडीकडून प्राइम डेव्हलपर्सची चौकशी
२२ डिसेंबर : ईडीकडून वांद्रा येथील खुला भूखंड व सांताक्रुझमधील नऊ मजली इमारत, अशी ११० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
१३ जानेवारी : भुजबळ यांना क्लीन चिट नाही - मुख्यमंत्री
२८ जानेवारी : भुजबळांसह कुुटुंबीयांवर महिन्याभरात आरोपपत्र, एसीबीची हायकोर्टाला माहिती
१ फेब्रु.२०१६ : छगन भुजबळ अमेरिकेला रवाना. भुजबळ यांच्याशी संबंधित ९ मालमत्तांवर ईडीचे छापे. समीर भुजबळची ईडीकडून दिवसभर चौकशी. समीर यांना रात्री उशिरा अटक.
२ फेब्रुवारी : भुजबळांवरील कारवाई सूडबुद्धीने - शरद पवारांचा आरोप
२४ फेब्रु. : भुजबळांवर आरोपपत्र दाखल
१४ मार्च : छगन भुजबळ यांना अटक