नेरळमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
By admin | Published: June 10, 2016 03:05 AM2016-06-10T03:05:57+5:302016-06-10T03:05:57+5:30
नेरळ शहरातील अनेक विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.
नेरळ : रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद, नेरळ विकास प्राधिकरण व ग्रामपंचायत नेरळ यांच्या माध्यमातून नेरळ शहरातील अनेक विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. रायगड जिल्हा परिषद, नेरळ विकास प्राधिकरण व ग्रामपंचायत नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
गुरु वारी सकाळी ११ वाजता नेरळ ग्रामपंचायतीच्या राजमाता जिजामाता भोसले तलावाचे करण्यात आलेल्या नूतनीकरणाचे लोकार्पण नेरळच्या सरपंच सुवर्णा नाईक यांच्या हस्ते आणि रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. अलिबाग रेवदंडा येथील श्री शारदा इन्फ्रा प्रोजेक्ट यांच्या माध्यमातून जिजामाता तलाव सुशोभीकरण करण्यात आले आहे. नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असलेल्या राजमाता जिजामाता तलावाचे नूतनीकरण करण्याचे काम सहा महिन्यांपूर्वी रेवदंडा येथील श्री शारदा इन्फ्राप्रोजेक्टने सुरू केले. सर्व तलावाला संरक्षण भिंत, पथपद, वृक्ष लागवड करण्यात आली असून ५०० ट्रक माती, दगड तलावातून काढण्याचे काम केले.
कुंभारआळी व दगडीशाळा यांच्या एकत्रित तळमजला अधिक दोन मजले नवीन इमारतीचे भूमिपूजन, मटण मच्छी मार्केट नूतनीकरण कामाचा शुभारंभ, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन, नेरळची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी व अवजड वाहने नेरळच्या बाहेरून जाण्यासाठी नेरळ -कळंब मुख्य रस्ता व पेशवाई मार्ग साईमंदिर चौक ते उमानगर दामत रेल्वे गेट रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे, जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे, एकनाथ धुळे, पूजा थोरवे, शिवसेना शहरअध्यक्ष रोहिदास मोरे, उपशहराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नेरळचे उपसरपंच पप्पू शेळके यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण पेमारे, माजी सदस्य नागो गवळी, अनसूया पादिर, कामगार नेते विजय मिरकुटे, शिवसेनेचे शहरप्रमुख रोहिदास मोरे, शेकापचे नेते राम राणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, माजी सभापती तानाजी चव्हाण, मनसेचे जिल्हा संघटक राजू मरे, आरपीआयचे मारु ती गायकवाड, राष्ट्रवादीचे नंदू कोळंबे, प्रभाकर देशमुख, शेकापचे प्रकाश पेमारे आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
>विविध कामे
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र, नूतनीकरण कामाचा शुभारंभ, नेरळ कन्याशाळा नवीन चार वर्गखोल्या इमारतीचे भूमिपूजन आणि विशेष म्हणजे नेरळकरांच्या हितासाठी व नेरळमधील टपरीधारकांना जागा देण्यासाठी विश्रामगृह व्यापारी संकुल व इतर शासकीय कार्यालये एकत्रीकरणासाठी नवीन व्यापारी संकुल इमारतीचे भूमिपूजन अशा अनेक विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा सुरेश टोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला.