भूपेंद्र वीरा हत्याप्रकरण; तपास गुन्हे शाखेकडे
By admin | Published: October 19, 2016 06:22 AM2016-10-19T06:22:13+5:302016-10-19T06:22:13+5:30
आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
मुंबई : आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांना अटक केली असली तरी या हत्येमध्ये अजूनही काही लोकांचा हात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अनधिकृत बांधकामांबाबत त्यांनी टाकलेल्या शेकडो माहिती अधिकारामुळे वीरा यांचे कलिना परिसरात शत्रू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वाकोला पोलिसांनी अटक केलेला माजी नगरसेवक रझाक खान याने वीरा यांना अब्दुल रजाक खान चाळीतील घर खाली करण्यासाठी मोठ्या रकमेची आॅफर दिली होती. जी करोडोंच्या घरात होती. मात्र वीरांनी ती नाकारली. हे प्रकरण आता वाकोला पोलिसांकडून गुन्हे शाखा कक्ष ८ला वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार वीरा यांच्या अन्यही शत्रूंची चौकशी पोलीस करणार आहेत. त्यांच्या मोबाइलचे सीडीआर तपासून
मृत्यूपूर्वी ते कोणाकोणाच्या संपर्कात होते, ही बाबही पडताळून पाहण्यात येत आहे.
‘रझाक खान कॉँग्रेसचे नाहीत’
माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येप्रकरणी वाकोला पोलिसांनी अटक केलेले रझाक खान हे कधीच काँग्रेसचे नगरसेवक नव्हते. उलट ते नेहमीच काँग्रेस उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असत, असा खुलासा मुंबई काँग्रेसने केला
आहे. (प्रतिनिधी)