भुसावळ- नागपुर लोहमार्गावरील रेल्वे पुल बनले धोकादायक!

By admin | Published: August 13, 2016 07:02 PM2016-08-13T19:02:15+5:302016-08-13T20:32:23+5:30

भुसावळ- नागपूर लोहमार्गावरील अनेक पुलांनी शंभरी गाठली आहे. लोहामार्गावरील रेल्वे पूल धोकादायक बनत असल्याने या मार्गावर महाड पेक्षाही अपघाताची मोठी दुर्घटना होऊ शकते.

Bhusaval- Railway bridge over Nagpur railway line becomes dangerous | भुसावळ- नागपुर लोहमार्गावरील रेल्वे पुल बनले धोकादायक!

भुसावळ- नागपुर लोहमार्गावरील रेल्वे पुल बनले धोकादायक!

Next
>फहीम देशमुख/ऑनलाइन लोकमत -
नागझरी जवळील पुल मोजत आहेत शेवटच्या घटका 
शेगाव (बुलडाणा), दि. 13 -   भुसावळ- नागपूर लोहमार्गावरील अनेक पुलांनी शंभरी गाठली आहे. लोहामार्गावरील रेल्वे पूल धोकादायक बनत असल्याने या मार्गावर महाड पेक्षाही अपघाताची मोठी दुर्घटना होऊ शकते.
 
 महाडमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खबरदारीबाबत पावले उचलली आहेत. मात्र केंद्र शासनाच्या अखत्यारीतील पुलांबाबत अद्याप कुठलेच आदेश नसल्याने ‘लोकमत’ने शनिवारी या पुलाचा आढावा घेतला. ब्रिटीश राजवटीत मुंबई हावडा ही देशातील दोन मोठी शहर रेल्वे, मागार्ने जोडून दळणवळणाचा मार्ग सुकर करावा, या हेतून रेल्वे मार्ग उभारण्यात आला. या मार्गावर  शेगाव जवळील नागझरी येथे १९१५  साली रेल्वेपूल उभारण्यात आला होता. या पुलाला १०२ वर्षे झाली आहेत. दररोज सतत रेल्वे गाड्यांचा भार सहन करीत आहे. दररोज शेकडो गाड्या या पुलावरून धावतात. सदर पूल कालबाह्य झाल्याचे पत्रही ब्रिटिश शासनाने भारत सरकारला पाठविले आहे. या पुलाखालील एक पिलर जीर्ण झाल्याने रेल्वे विभागाने या पिलरची दुरुस्ती केली आहे; मात्र या पुलाचे इतर पिलर ही जीर्ण झाल्याने येथून रेल्वे गाडी गेल्यास सदर पूल पूर्ण पाने हादरतो.  यामुळे  सदर पूल धोक्याचा असून येथे दुसरा समांतर पूल बांधणे गरजेचे झाले आहे. सावित्री नदीवरील ब्रिटीश कालीन पूल वाहून गेल्याची घटना ताजी आहे. यापार्श्वभूमीवर ‘लोकमत’चमूने या पुलावर जावून आढावा घेतला असता, याठिकाणीही महाड येथील सावित्री नदीवरील पुलासारखी घटना घडू शकते, असे निदर्शनास आले. मन नदीवर बांधण्यात आलेला हां पुल शेगाव ते बडनेरा पर्यंत च सर्वात मोठा पुल असून याची लांबी ३०० मीटर एव्हडी आहे. या रेल्वे पुलावरुन दररोज मालगाडीसह दररोज पॅसेंजर, एक्सप्रेस गाड्यांसह १०० च्या वर मालगाड्या धावतात.  अशा या महत्वपुर्ण पुलाच्या देखभाली बाबतीत प्रशासनाकडून कुचराई केली जात असल्याचे या पुलाच्या दुरावस्थेकडे बघून लक्षात येते. रेल्वे प्रशासनाने येथे नवीन पुलाची निर्मिती करावी अशी मागणी रेल्वे प्रवश्यांच्यावतीने करण्यात आली आहे.
 
.... अन्यथा महाडसारख्या घटनेची शक्यता
पुलाच्या स्ट्रॅक्चरल आॅडिटचे काम चार्टर्ड इंजिनिअरकडे देण्यात आले आहे. पुलाची क्षमता, सध्याची स्थिती, झाडेझुडपे, आयुर्मान, पूल बांधताना वापरण्यात आलेले इतर घटक, आजूबाजूचा भराव आदींची तपासणी करण्यात येणार आहे. या आॅडिटबाबत १५ दिवसांत अहवाल येणार आहे. हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल आल्यास तो बंद करण्यात येणार आहे. राज्यशासनाने त्यांच्या अखत्यारित असलेल्या पुलांचे आॅडिट करीत आहे. मात्र केंद्रशासनाच्या अखत्यारीतील रेल्वेच्या भुसावळ  ते नागपुर या लोहामार्गावरील पूल आजही जैसे थे असून  पुलांचे ही आॅडिट होणे गरजेचे झाले आहे. अन्यथा महाड पेक्षाही मोठा अपघात रेल्वे पुलांजवळ होण्याची शक्यता नकारता येत नाही.            
        
१०२ वर्षाचा झाला नागझरी जवळील पूल 
नागझरी टा. शेगाव जवळील भुसावळ ते नागपुर लोहामार्गावरील ब्रिटिश कालीन पूल आहे. सन  १९१५  साली हा रेल्वेपूल उभारण्यात आला होता. साध्य या पुलाला १०२ वर्षे झाली आहेत.

Web Title: Bhusaval- Railway bridge over Nagpur railway line becomes dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.