नरेंद्र मोदींकडून लसीकरणाबाबत मोठी घोषणा, राज्यातील नियोजनाबाबत राजेश टोपे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 10:32 AM2021-12-26T10:32:29+5:302021-12-26T10:32:43+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे.

Big announcement from Narendra Modi about vaccination, Rajesh Tope says about planning in the state | नरेंद्र मोदींकडून लसीकरणाबाबत मोठी घोषणा, राज्यातील नियोजनाबाबत राजेश टोपे म्हणतात...

नरेंद्र मोदींकडून लसीकरणाबाबत मोठी घोषणा, राज्यातील नियोजनाबाबत राजेश टोपे म्हणतात...

googlenewsNext

नवी दिल्ली: काल म्हणजेच 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे अनेकजण स्वागत करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही त्यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे.

राज्यात योग्य नियोजन केले जाईल
नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, 'देशातील 15 ते 18 वर्षाच्या वयोगटातील मुलांचे लसीकरण, वृद्ध आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याबाबत पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. गेल्या महिन्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने केंद्रीय आरोग्य मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली होती. आज पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेची खरी गरज होती. आता राज्यातही लसीकरणाबाबत योग्य पद्धतीने नियोजन केले जाईल. याशिवाय सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असेल, असे टोपे म्हणाले.
 
उद्धव ठाकरे काय म्हणाले ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील सात डिसेंबररोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती. पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांनादेखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी कोणती घोषणा केली ?
देशात कोरोनाचा धोका हळूहळू कमी होत असताना कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉन मात्र हातपाय परसतो आहे. अशा परिस्थितीत DGCIकडून लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन आपातकालीन स्थितीत मान्यता देण्यात आली आहे. त्यातच शुक्रवारी नाताळ आणि स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बूस्टर डोसबद्दल महत्त्वाची घोषणा केली. 

3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच 10 जानेवारी 2022 पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे 10 जानेवारीपासूनच 60 वर्षांवरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
 

Web Title: Big announcement from Narendra Modi about vaccination, Rajesh Tope says about planning in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.