‘बिग बीं’चा वाढदिवस 'डॉन' स्टाईलने उत्साहात

By Admin | Published: October 12, 2015 12:43 AM2015-10-12T00:43:13+5:302015-10-12T00:54:42+5:30

७४ वा वाढदिवस : शहरात चाहत्यांकडून फटाक्यांची आतषबाजी, केकचे वाटप

'Big B' birthday celebrates with 'Don' Style! | ‘बिग बीं’चा वाढदिवस 'डॉन' स्टाईलने उत्साहात

‘बिग बीं’चा वाढदिवस 'डॉन' स्टाईलने उत्साहात

googlenewsNext

कोल्हापूर : भारतीय चित्रपटसृष्टीत ज्यांची ओळख ‘बिग बी’ आहे, असे ‘डॉन’ समजले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७४ वा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा झाला. देशातील विविध शहरांसोबत बच्चनप्रेमींनी कोल्हापुरात उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अमिताभ बच्चन यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यानिमित्त कोल्हापुरातील अमिताभ बच्चनप्रेमी रिक्षाचालक शशिकांत गजगेश्वर यांनी संपूर्ण रिक्षाला (एमएच ०९-जे ८१६८) ‘बिग बी’चे रिफ्लेक्स लावले. गजगेश्वर यांनी शहरातील चौका-चौकांत केक कापून चॉकलेट्स वाटली. त्याचबरोबर दिवसभर आपल्या रिक्षामधून प्रवाशांना मोफत सेवा देत त्यांना इच्छित स्थळी पोहोचवले. तसेच रिक्षामध्ये अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांतील गीते टेपरेकॉर्डरवर लावून प्रवाशांना खुश करुन टाकले. गजगेश्वर यांची रिक्षा दिवसभर चर्चेचा विषय ठरली.
दरम्यान, ‘बच्चनवेडे’ ग्रुपच्या वतीने शिवाजी चौकात अमिताभ बच्चन यांचे भव्य पोस्टर लावून, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी केक कापून बच्चन यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या ठिकाणी बच्चनप्रेमी शशिकांत गजगेश्वर यांनीही उपस्थिती लावली. त्याचबरोबर काही बच्चनप्रेमींनी शहरातील मोठ्या हॉटेलांमध्ये ‘बिग बीं’चा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवरही बच्चन यांच्या चित्रपटांतील व त्यांच्या जीवनातील काही दृश्ये शेअर होत होती. ( प्रतिनिधी )

कोल्हापुरात शिवाजी चौकात रविवारी बच्चनवेडे ग्रुप यांनी केक कापून व फटाके वाजवून ‘बिग बी’ यांचा वाढदिवस दिमाखात साजरा केला. यावेळी बच्चनपे्रमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोल्हापुरातील अमिताभ बच्चन पे्रमी असलेले शशिकांत गजगेश्वर यांनी आपली रिक्षा अशा प्रकारे सजविली होती.

Web Title: 'Big B' birthday celebrates with 'Don' Style!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.