Pune Rape Case: स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी अखेर सापडला; कुठे लपला होता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 02:41 IST2025-02-28T02:40:52+5:302025-02-28T02:41:37+5:30
Dattatray Gade Arrested: स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते.

Pune Rape Case: स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी अखेर सापडला; कुठे लपला होता?
Dattatray Gade Arrested: स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या. दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. तसेच गावकऱ्यांनी त्याला गावात पहिल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी गुनाट या गावातच त्याचा शोध घेण्याची ठरवले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. आणि गुनाट गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला. ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता. अखेर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला.
दरम्यान स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेला दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १३ पथके रवाना करण्यात आली होती. तसेच डॉगस्कॉड, ड्रोनच्या साहाय्यानेही आरोपीची शोधमोहीम सुरु आहे. घटनेच्या दोन दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी न सापडल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते..
बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गाव परिसरात गेल्याची माहिती समोर आली होती. इतकच नाही तर आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत
होती. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जात होता. अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाताला लागला. त्याला घेऊन पोलिसांची पथक आता पुण्याच्या दिशेने निघाले आहे.