मोठ्या भावावर हसला म्हणून केली हत्या...लालबागमधील घटना, पोलिसांनी घातल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 03:02 AM2017-11-17T03:02:06+5:302017-11-17T03:02:24+5:30
काळाचौकीच्या म्हाडा वसाहतीत वैभव जाधव (२४) हा कुटुंबीयांसोबत राहत होता. यापूर्वी जाधव कुटुंब लालबागला राहायला होते. तेथील चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असल्याने ते म्हाडा वसाहतीत राहायला आले.
मुंबई : मानसिक रुग्ण असलेल्या मोठ्या भावावर हसल्याच्या रागातून दोन धाकट्या भावांनी लालबागमधील तरुणाची बुधवारी हत्या केली. या प्रकरणी गुरुवारी पहाटे दोन्ही भावांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे.
काळाचौकीच्या म्हाडा वसाहतीत वैभव जाधव (२४) हा कुटुंबीयांसोबत राहत होता. यापूर्वी जाधव कुटुंब लालबागला राहायला होते. तेथील चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असल्याने ते म्हाडा वसाहतीत राहायला आले. मात्र, वैभव जुन्या मित्रांना भेटण्यासाठी रोज रात्री लालबागमध्ये येत असे. बुधवारी रात्री ११च्या सुमारास नेहमीप्रमाणे तो लालबागच्या चाळीत मित्रांची वाट पाहत उभा होता. त्याचदरम्यान समोर उभ्या असलेल्या विजय, जगदीश आणि सूर्यकांत पडवळ या भावंडांकडे पाहून तो हसला. सूर्यकांत मानसिक रुग्ण आहे. वैभवसह त्याचे मित्र नेहमीच सूर्यकांतची खिल्ली उडवत. बुधवारीही अशीच मस्करी सुरू होती.
वैभव हा सूर्यकांतवर हसला. ते पाहून दोन्ही भाऊ रागावले. विजयने रागाच्या भरात जवळील लाकडी बांबूने वैभवच्या डोक्यावर हल्ला केला. यात वैभवच्या मृत्यू झाला. पडवळ भावंडांनी तेथून पळ काढला. काळाचौकी पोलिसांनी गुरुवारी सकाळी नालासोपारातून एका भावाला व दुपारी दुसºयालाही अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप उगळे यांनी दिली.