मुंबई-पुण्याबाहेरील कलावंतांमध्ये मोठी क्षमता - फय्याज

By admin | Published: February 20, 2016 03:16 AM2016-02-20T03:16:05+5:302016-02-20T03:16:05+5:30

संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर वर्षभर १०-१२ शाखांना भेटी दिल्या. नव्या गायकांचे गाणे ऐकले. मुंबई-पुण्याबाहेरसुद्धा खूप मोठी क्षमता असल्याची प्रचीती मला आली

Big capacity among artists outside Pune - FYIZ | मुंबई-पुण्याबाहेरील कलावंतांमध्ये मोठी क्षमता - फय्याज

मुंबई-पुण्याबाहेरील कलावंतांमध्ये मोठी क्षमता - फय्याज

Next

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगरी (ठाणे) : संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर वर्षभर १०-१२ शाखांना भेटी दिल्या. नव्या गायकांचे गाणे ऐकले. मुंबई-पुण्याबाहेरसुद्धा खूप मोठी क्षमता असल्याची प्रचीती मला आली. ते शोधून काढण्याची गरज माजी संमेलनाध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज शेख यांनी व्यक्त केली.
९६ व्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात फय्याज यांनी आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, वर्ष कसं सरले, कळलेच नाही. म्हणताम्हणता ९६ वे संमेलन आले. मालवणी भाषेला प्रतिष्ठा मिळवून देणारे गंगाराम गवाणकर संमेलनाध्यक्ष झाले, त्याचा सबंध महाराष्ट्राला आनंद झाला. या वेळी त्यांनी ठाण्याचे
रसिक दाद देणारे आहेत. हे शहर कलावंतांची रंगभूमी असल्याचेही त्या म्हणाल्या.
संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक न घेता जाणकार रंगकर्मी, नियामक मंडळ आणि मध्यवर्तीच्या कार्यकारिणीने एकमताने निवड करावी. त्यात रंगमंचाच्या मागे काम करणारे नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, वेशभूषाकार अशांचाही समावेश असावा, असेही त्या म्हणाल्या.
नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, बॅकस्टेज आर्टिस्टला वेगवेगळी कामे करताना अपघात होत असतात. त्यांना जे रुग्णालये महानगरपालिकांतर्गत येतात, तिथे २ बेड असावेत, अशी मागणी केली. शासन, महानगरपालिकांची नाट्यगृहे बालनाटकांसाठी सवलतीच्या दरात मिळावीत, असे सांगत परिषदेचे यशवंत नाट्यगृह आम्ही अर्ध्या दरात देतो, असे सांगितले.

Web Title: Big capacity among artists outside Pune - FYIZ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.