जाहिरातदारांसमोर मोठे आव्हान

By admin | Published: November 9, 2014 01:14 AM2014-11-09T01:14:39+5:302014-11-09T01:14:39+5:30

जाहिरातींमध्ये होऊ घातलेली विविधांगी ‘इनोव्हेशन्स’ हा सध्याचा विवादास्पद भाग आहे. अशा जाहिरातींचा सुळसुळाट झालेला दिसत आहे.

The big challenge before the advertisers | जाहिरातदारांसमोर मोठे आव्हान

जाहिरातदारांसमोर मोठे आव्हान

Next
जाहिरातींमध्ये होऊ घातलेली विविधांगी ‘इनोव्हेशन्स’ हा सध्याचा विवादास्पद भाग आहे. अशा जाहिरातींचा सुळसुळाट झालेला दिसत आहे. येनकेन प्रकारेण लोकांच्या नजरेस कसे पडता येईल, यासाठी आघाडीच्या ब्रँड्सची नेहमी कसरत सुरू असते. डोकं लढवून क्रिएटिव्ह अॅड्स करायच्या अन् भुवया उंचावल्या जातील अशी पोङिाशन पटकावून लोकांपुढे जायचा हा सोस. भारतीय जाहिरात क्षेत्रत बालग्राहकांची भूमिका महत्त्वाची असली, तरी या क्षेत्रकडे अजूनही गांभीर्याने पाहिलं जात नाही. लहान मुलांच्या संदर्भात बोलायचं झालं, तर त्यांच्यासाठी असलेल्या उत्पादनांच्या जाहिरातींपेक्षा अन्य जाहिरातींविषयीच चौकसपणो विचार होणो गरजेचे आहे. 
 
   श्ॉम्पू, परफ्युम, स्मार्ट फोन्स वा कंडोम अशा जाहिरातींचा लहान मुलांच्या मनावर नेमका काय परिणाम होतो? दृश्यात्मक परिणाम हा लगेच होत असल्यामुळे या जाहिरातींमुळे लहान मुलांच्या विचारप्रणालीत बदल होतो त्याचे काय, या मुद्दय़ांवर विचार करणारी व्यवस्था भारतीय जाहिरात क्षेत्रत नाही, ही खेदजनक बाब आहे. यासाठी शासनाकडून काडीचीही अपेक्षा न करता अॅड एजन्सींनीच पुढाकार घेतला पाहिजे. कारण जाहिराती क्षेत्रतील तज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ अशा विविध मार्गदर्शकांच्या मदतीने याविषयी ठोस व्यवस्था निर्माण केली गेली पाहिजे, जेणोकरून अशा इतर जाहिरातींचा लहान मुलांच्या जडणघडणीवर होणारा परिणाम याबद्दल गांभीर्याने विचार केला जाईल. शिवाय त्यावर कृतिशील निर्णय घेऊन अशा जाहिरातींवर र्निबध किंवा ठरावीक नियम घालून दिले जातील. 
    जाहिरात क्षेत्रचा जागतिक पातळीचा विचार केला, तर परेदशात यापूर्वीच अशा प्रकारची व्यवस्था अस्तित्वात आली आहे आणि ही व्यवस्था जाहिरात क्षेत्रत महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या देशात सरकारने जाहिरातींमधील लहान मुलांच्या सहभागाला बालमजुरी म्हटले आहे, हे चुकीचे आहे. याबाबत सर्व बाजूंनी विचार करून योग्य भूमिका घेतली पाहिजे होती. सरकार जाहिरात क्षेत्रच्या सद्य:स्थितीबद्दल अनभिज्ञ आहे. त्यामुळे आता जाहिरात क्षेत्रतील तज्ज्ञांनी एकत्र येण्याची गरज आहे. सोशल मीडियाचे जाळे वेगाने पसरत असूनही बालग्राहकांवर टीव्हीवरील जाहिरातींचा मोठा पगडा आहे. त्यामुळे त्यांच्या कोवळ्य़ा मानसिकतेचा विचार झाला पाहिजे.
 टू मर्ज विथ.. म्हणजे एखाद्या गोष्टीशी एकरूप होणो, त्यात मिसळून जाणो, याच शब्दाच्या अनेक अर्थछटा आहेत. त्यातलाच विकसित झालेला एक शब्द म्हणजे मर्चडायङिांग. आपल्या उत्पादनाच्या जाहिरातींसाठी अनेक जण यासाठी अनेक प्रय} करीत असतात. विविध माध्यमांमधून या जाहिराती केल्या जात असतात. त्याच त्याच जाहिराती करण्याबरोबरच जाहिरात करण्याचे विविध उपायही जाहिरात संस्थांकडून योजले जातात. त्यातल्या काही जाहिराती या थेट असतात, तर काही जाहिराती या छुप्या पद्धतीने केल्या जातात. या अशा छुप्या पद्धतीने केलेल्या जाहिराती थेट जाहिरातींपेक्षा अधिक परिणामकारक होतात.
जाहिरात क्षेत्रला भविष्यात अधिक आव्हानांना सामोरे जावे लागेल. मात्र त्यासाठी आतापासून तयारी केली पाहिज़े लहान मुलांची पिढी म्हणजेच बालग्राहक वर्ग साक्षर करण्यासाठी, या पिढीची योग्य जडणघडण होण्यासाठी जाहिरात क्षेत्रतील तज्ज्ञांनी व्यासपीठ निर्माण केले पाहिजे.
  थेट परदेशी गुंतवणुकीमुळे येथील जाहिरात क्षेत्रला ऊर्जितावस्था आली आणि ती अधिक गतिमान झाली आहे. त्यामुळे लहान आणि मध्यम मार्केटिंग एजन्सींना दारे खुली झाली आहेत. साहजिकच बालग्राहक त्यांच्या रडारवर आहे. सध्याची परिस्थिती पाहता पाच वर्षार्पयतच्या मुलांना ब्रँडची जाणीव होत असते. ही मुले मोठी होत असताना त्यांना जाहिरातीनुसार नव्हे, तर गरजेनुसार खरेदी करण्याची सवय असलेले संवेदनशील ग्राहक घडवण्याचे काम करावे लागेल. 
  गेल्या 1क् वर्षात भारतीय ग्राहकांच्या खरेदी क्षमतेत वाढ झाली आहे. मॅकॅन्झी ग्लोबल इन्स्टिटय़ूटच्या निष्कर्षानुसार 2025 र्पयत भारत हा ग्राहकतेबाबत जगातील पाचवा मोठा देश असेल. म्हणूनच ई - कॉमर्स कंपन्या डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून अधिकाधिक ग्राहकांर्पयत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. टीव्हीवरील जाहिरातींचे प्रमाण वेगाने वाढत असून, काही वर्षात नियतकालिकांनाही ते मागे टाकण्याची शक्यता आहे. म्हणूनच लहान मुले हे त्यांचे सर्वात मोठे लक्ष्य असेल.  (लेखक जाहिरात क्षेत्रतील अॅडगुरू आहेत़)
 
जाहिरातींबाबत र्सवकष विचार व्हावा
आपल्या देशात सरकारने जाहिरातींमधील लहान मुलांच्या सहभागाला बालमजुरी म्हटले आहे, हे चुकीचे आहे. याबाबत सर्व बाजूंनी विचार करून योग्य भूमिका घेतली पाहिजे. सरकार जाहिरात क्षेत्रच्या सद्य:स्थितीबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे आता जाहिरात क्षेत्रतील तज्ज्ञांनीच एकत्र येण्याची गरज आहे. जाहिरातीबाबत मुलांच्या कोवळ्य़ा मानसिकतेचा विचार झाला पाहिज़े
 
टीव्हीपेक्षा भावनिक गुंतवणुकीची गरज
अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अहवालानुसार दोन ते 17 वर्षे वयोगटातील मुले वर्षाला सरासरी तीन ते पाच हजार तास टीव्ही पाहण्यात मग्न असतात. शाळेत काढलेल्या वेळेपेक्षा हा कालावधी अधिक असतो. त्यामुळे पालकांपेक्षा त्यांच्यावर टीव्हीचा प्रभाव अधिक असतो. दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची घरातील व्यक्तींसोबत भावनिक गुंतवणूक अधिक असणो आवश्यक असल्याने या मुलांना फार वेळ टीव्ही पाहू देऊ नये, असे अमेरिकन बालरोगतज्ज्ञ अॅकॅडमीचे म्हणणो आहे.
 
आक्षेपार्ह जाहिरातींवर बंदी
1क् वर्षाखालील मुले व्यावसायिक जाहिराती आणि अन्य कार्यक्रम यातील फरक समजू शकत नसल्याने तसेच 12 वर्षार्पयतची मुले व्यावसायिक जाहिरातींमागील उद्देश समजू शकत नसल्याचे आढळल्याने 1991 पासून स्वीडनमध्ये मुलांच्या प्राइम टाइममधील जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे.
 
- प्रल्हाद कक्कर

 

Web Title: The big challenge before the advertisers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.