मोर्चा तयारीलाही मोठी गर्दी

By admin | Published: September 22, 2016 02:11 AM2016-09-22T02:11:13+5:302016-09-22T02:11:13+5:30

मराठा समाजाच्या वतीने निघणाऱ्या मराठा क्रांती मोचार्साठी हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, लोणी काळभोर या ठिकाणी नियोजनासंदर्भात बैठका झाल्या

The big crowd prepared for the march | मोर्चा तयारीलाही मोठी गर्दी

मोर्चा तयारीलाही मोठी गर्दी

Next


उरुळी कांचन : पुणे येथील २५ सप्टेंबरला मराठा समाजाच्या वतीने निघणाऱ्या मराठा क्रांती मोचार्साठी हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, लोणी काळभोर या ठिकाणी नियोजनासंदर्भात बैठका झाल्या. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे युवकांनी मोठ्या प्रमाणात या बैठकांना हजेरी लावली होती. तसेच सर्वपक्षीय आजी-माजी पदाधिकारी आणि महिलांचीही विशेष उपस्थिती होती.
कोपर्डी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, मराठा आरक्षण त्वरित मिळावे यासह अ‍ॅट्रॉसिटी कायदा दुरुस्त करावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती मिळावी आणि शेतीमाल उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने हमी बाजारभाव मिळालाच पाहिजे.
या मोर्चात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड, उपाध्यक्ष राकेश काळभोर, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख गोरख कामठे, तालुकाध्यक्ष विजय गोते, कार्याध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, उपाध्यक्ष शैलेश चौधरी, निखिल गोते, नंदनी मुरकुटे आदी पदाधिकारी प्रयत्न करताना दिसत आहे. गटतट विसरून राजकीय जोडे बाजूला ठेवून युवकाचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या प्रसंगी महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती योगिनी कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष देविदास कांचन, माजी उपसरपंच भाऊसाहेब तुपे, मनसे शहर अध्यक्ष विजय मुरकुटे, ग्रामपंचायत सदस्य सुनील कांचन, सागर पोपट कांचन, तंटामुक्तीचे अध्यक्ष अमित कांचन, निखिल खेडेकर, हवेली राष्ट्रवादी उपाध्यक्ष सागर कांचन, शहराध्यक्ष सुभाष बगाडे, माजी सदस्य मारुती कांचन, नितीन कांचन शांताराम चौधरी,निखिल कांचन, शुभभ काळे, दत्तात्रय कोल्हे, गणपत गायकवाड आदी उपस्थित होते.
>सोशल मीडियाचा जोर
मराठा समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ईबीसी सवलत उत्पन्नमयार्दा ६ लाख करा, यासाठी पुणे येथे २५ सप्टेंबरला मराठा समाजाच्या वतीने निघणाऱ्या मराठा क्रांती मोचार्साठी पूर्व हवेलीत गावोगावी नियोजनाच्या बैठकांनी मोठ्या प्रमाणात वेग घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. युवकांनी जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यासही सुरुवात केली आहे.

Web Title: The big crowd prepared for the march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.