शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 04:04 PM2023-05-03T16:04:37+5:302023-05-03T16:05:21+5:30

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य. सर्व शहरांमध्ये प्रकल्प राबविणार.

Big decision of Shinde-Fadnavis government these boys and girls will get scholarships for higher education abroad | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

googlenewsNext

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात, कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत दरवर्षी 25 मुला-मुलींना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याशिवाय इतरही काही महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यही उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय - 

  • घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प राबविणार.  महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य. सर्व शहरांमध्ये प्रकल्प राबविणार.
  • महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होणार.
  • शिरोळ तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय.
  • करमणूक शुल्क आकारणीमध्ये सुट देण्याचा निर्णय. 

Web Title: Big decision of Shinde-Fadnavis government these boys and girls will get scholarships for higher education abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.