वह्या, पुस्तके, रजिस्टरला मोठी मागणी
By admin | Published: June 6, 2017 02:45 AM2017-06-06T02:45:26+5:302017-06-06T02:45:26+5:30
शाळेच्या सुटया आता संपत आल्या असून यंदा पावसाने मध्येच जोर दाखवून कधी थंड केलेले तर कधी उन्हाचे चटके असे विषम वातावरण सध्या जव्हारमध्ये बघावयास मिळत आहे.
हुसेन मेमन।
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार: शाळेच्या सुटया आता संपत आल्या असून यंदा पावसाने मध्येच जोर दाखवून कधी थंड केलेले तर कधी उन्हाचे चटके असे विषम वातावरण सध्या जव्हारमध्ये बघावयास मिळत आहे. पावसाने अद्याप सुरवात केलेली नसल्यामुळे कडक उन्हातही खेडोपाड्यातील व शहरातील बांधव खरेदीच्या लगबगीत दिसत आहेत. विद्यार्थी आणि पालक या सर्वांना शाळेचे वेध लागले आहे.
सध्या विद्यार्थी जगतात दप्तरे, वह्या, रजिस्टर, नवीन शाळेचे गणवेश, शालेय साहित्य, बूट, रेनकोट, छत्र्या या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झालेली आहे. जव्हार तालुक्यात एकूण १ लाख ६० हजारच्या आसपास लोकसंख्या आहे, आणि खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना व शहरी विद्यार्थ्यांना यासर्व शालेयपयोगी वस्तू खरेदीसाठी जव्हार येथील बाजारपेठेत यावे लागत, त्यामुळे मोठ्या संख्येने बाजरपेठ भरगङ्ख असल्याचे दृष्य सर्वत्र दिसत आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी वर्ग उत्साहात आपल्याला लागणारे साहित्य खरेदी करण्याकरीता वह्या, रजिस्टर, पेन, पेन्सील, दप्तर, छत्री आदिंची लिस्ट तयार करून दुकानादाराकडे देऊन साहित्य घेत आहेत. गतवषार्पेक्षा यंदा हे साहित्य १५ ते २० टक्क्यांनी वाढल्यामुळे खिशाला मात्र कैची लागल्याने पालकवर्गात थोड्या प्रमाणात नाराजी दिसत आहे.
दप्तर, कंपास, छत्री, रेनकोट, या वस्तूंमध्ये शेकडो प्रकार उपलब्ध असतात, त्यामुळे विद्यार्थी कुठल्या प्रकारची निवड करेल, याचा थांगपत्ता दुकानदाराला नसतो, आणि आपल्याकडे आलेला ग्राहक परत जाऊ नये म्हणून दुकानदार मोठ्या प्रमाणात नाना प्रकारच्या शालेय वस्तू उपलब्ध करून ठेवतो, त्यामुळे व्यापारी वर्गाचीही मोठ्या प्रमाणात रक्कम अडकलेली असते, सिझन सुरू झाला की, व्यापाऱ्यांना जेवणाचीही फुरसत नसते, असे जव्हारचे व्यापारी इम्तियाज बल्लू यांनी बोलतांना सांगितले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खरेदीदारांत थोडीफार वाढ झालेली आहे, असेही इतर व्यापऱ्यांचे म्हणणे आहे.
शालेय उपयोगी वस्तू विविध प्रकारांत बाजारपेठेत दाखल झाले असून पाऊस सुरू न झाल्याने सध्यातरी बालगोपाळांची झुंबड बाजारात दिसत आहे.
यंदा बाजारपेठेत चांगली गर्दी दिसत आहे, रजिस्टर, पेन, कंपास, दप्तर, छत्री, रेनकोट खरेदी करीता ग्राहक येत आहेत.
-इम्तियाज बल्लू, क्लासीक जनरल व्यापारी, जव्हार