२५ प्रभागांत बिग फाइट

By admin | Published: February 11, 2017 04:00 AM2017-02-11T04:00:13+5:302017-02-11T04:00:13+5:30

ठाणे पालिका निवडणुकीत आजवर एकत्रित सत्ता उपभोगणारे मित्रपक्ष २५ वर्षांनंतर एकमेकांसमोर उभे ठाकल्याने या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Big fight in 25 divisions | २५ प्रभागांत बिग फाइट

२५ प्रभागांत बिग फाइट

Next

ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीत आजवर एकत्रित सत्ता उपभोगणारे मित्रपक्ष २५ वर्षांनंतर एकमेकांसमोर उभे ठाकल्याने या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदाच्या निवडणुकीत तब्बल २५ जागांवर ‘काटें की टक्कर’ पाहायला मिळणार असून काही ठिकाणी तीन महिलांविरुद्ध एक पुरुष अशी आगळी लढतही अनुभवता येणार आहे. काही ठिकाणी शिवसेनेने, कुठे आणि राष्ट्रवादीनेदेखील आपल्या जागांचा पाया मजबूत केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ, सुभाष भोईर यांचा पुत्र, प्रताप सरनाईक यांची पत्नी आणि मुलगा आदींसह दिग्गजांची प्रतिष्ठा या बिग फाइटमध्ये पणाला लागली आहे.

पूर्णेकर विरुद्ध पावशे
प्रभाग क्र.३ मध्ये शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक मधुकर पावशे विरोधात काँग्रेसचे छत्रपती पूर्णेकर असा सामना आहे. येथून भाजपाचे उमेदवार जयनाथ पूर्णेकर यांनी ऐन वेळेस माघार घेतल्याने लढत पावशे विरुद्ध छत्रपती होणार आहे.पाटील विरुद्ध मोकाशी
प्रभाग ४ मध्ये माजी महापौरविरोधात माजी उपमहापौर असा सामना रंगणार आहे. शिवसेनेचे एच.एस. पाटील विरोधात भाजपाचे मुकेश मोकाशी यांच्यामध्ये लढत आहे. चव्हाण विरुद्ध सरनाईक
प्रभाग ५ मध्ये सुधाकर चव्हाण यांनी पूर्ण पॅनल रिंगणात उतरवले असून येथे आमदार प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक आणि चव्हाण असा अटीतटीचा सामना रंगणार आहे. चव्हाण यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने त्याचा परिणाम येथे दिसेल.घाडीगावकर विरुद्ध शिंदे
एकनाथ शिंदे यांचा प्रभाग १७ मध्ये कस लागेल. त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या संजय घाडीगावकर यांची पत्नी स्वाती आणि पालकमंत्र्यांचे बंधू प्रकाश शिंदे निवडणुकीच्या रिंगणात असल्याने तेथे सर्वांचेच लक्ष आहे.बिष्ट विरुद्ध कोकाटे
प्रभाग क्रमांक २२ ड मधून राष्ट्रवादीचे महादीप बिष्ट विरुद्ध शिवसेनेचे निष्ठावान नगरसेवक सुधीर कोकाटे अशी लढत होणार आहे.


प्रभाग क्र मांक ६ मध्ये माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि माजी स्थायी समिती सभापती भय्यासाहेब इंदिसे अशी मुख्य लढत होणार आहे. जगदाळे यांचे नाव परमार प्रकरणात आले आहे. परंतु, त्यांचा प्रभागातील दांडगा अनुभव पाहता ते देखील सलग चार वेळा निवडून आले आहेत. तर, भय्यासाहेब यांचा मागील निवडणुकीत पराभव झाला होता.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले देवराम भोईर यांचा सामना प्रभाग शिवसेनेचे बंडखोर तथा भाजपाचे उमेदवार निलेश पाटील यांच्याशी होणार आहे. याच प्रभागात त्यांची सून उषा भोईर यांचा सामना शिवसेनेतून भाजपात गेलेल्या विद्यमान नगरसेविका शारदा पाटील यांच्याशी होणार आहे. याच प्रभागातून भाजपाच्या लॉरेन्स डिसोझा यांचा अर्ज बाद झाल्याने संजय भोईर यांच्यासाठी ही लढत एकतर्फी मानली जात आहे.

चव्हाण, मुल्ला यांच्यावर ‘परमार’ छाया
प्रभाग ७ मध्ये काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्याविरोधात इतर पक्षांतून फारसे दिग्गज उमेदवार नाहीत, पण तेथे परमार प्रकरणाची छाया आहे. प्रभाग १० मध्ये राष्ट्रवादीतर्फे नजीब मुल्ला रिंगणात असून त्यांच्यासमोर एकही मातब्बर उमेदवार नाही. एगडे विरुद्ध पाटील : प्रभाग ११ मध्येदेखील शिवसेनेच्या महेश्वरी तरे यांचा सामना कमकुवत उमेदवारांशी आहे. शिवसेनेतून भाजपात दाखल झालेल्या नंदा पाटील यांचा सामना शिवसेनेच्या वैशाली भोसले यांच्याशी, तर, राम एगडे यांचा मुलगा ललीत एगडे याचा सामना भाजपाचे कृष्णा पाटील यांच्याशी होणार आहे.राऊळ विरुद्ध विचारे : प्रभाग १२ मध्ये नारायण पवार यांचा भाजपाच्या बंडखोरांशी सामना आहे. याच प्रभागात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेले अशोक राऊळ हे भाजपाच्या चिन्हावर लढत असून त्यांचा सामना मंदार विचारे यांच्याशी होणार आहे. चव्हाण विरुद्ध राजे : प्रभाग क्रमांक २० मध्ये राष्ट्रवादीतून भाजपात डेरेदाखल झालेले आणि जायंट किलर म्हणून ओळख असलेले भरत चव्हाण यांचा सामना शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक गिरीश राजे यांच्याशी होत आहे. चव्हाण यांनी यापूर्वी पांडुरंग पाटील आणि गोपाळ लांडगे यांनादेखील धूळ चारली आहे.

वाघुले विरुद्ध फर्डे : प्रभाग १६ मध्ये गरूमुख स्यान यांचे काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्याविरोधात आव्हान आहे. प्रभाग २१ मध्ये संजय वाघुले यांच्याविरोधात शिवसेनेचे हिराकांत फर्डे असा सामना आहे. प्रभाग ९ मध्ये शिवसेनेच्या अनिता गौरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा पाटील यांच्यात लढत आहे.भगत विरुद्ध किणे : प्रभाग ३१ मध्ये शिवसेनेचे सुधीर भगत आणि काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले राजन किणे यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. हे दोघेही सध्या विद्यमान नगरसेवक आहेत. त्यामुळे आता या दोघांमधून पालिकेवर कोण जाणार, हे महत्त्वाचे.साळवी विरुद्ध साळवी
प्रभाग क्र मांक २५ मध्ये शिवसेनेचे गणेश साळवी, तर राष्ट्रवादीचे महेश साळवी यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी
प्रभाग २४ मध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गणेश नाईक असा वाद असून नाईक गटाचे अक्षय ठाकूरविरोधात अपक्ष म्हणून जितेंद्र पाटील रिंगणात असल्याने पक्षाच्या दोन्ही गटांतच संघर्ष आहे.

वडवले विरुद्ध दळवी : प्रभाग क्र मांक १३ मध्ये शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक संतोष वडवले यांच्याविरोधात शिवसेनेकडून बंडखोरी करून संजय दळवी यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या प्रभागामध्ये निवडणुकीची रंगत वाढली आहे. संतोष वडवले यांच्या विरोधात काही शिवसैनिक आक्र मक झाल्यामुळे काही शिवसैनिकांनी या ठिकाणी त्यांचा प्रचार सुरू केला आहे. भाजपाच्या भरत पडवळ यांनीदेखील शिवसेनेच्या उमेवारासमोर आव्हान उभे केले आहे.

सरय्या विरुद्ध बारटक्के : प्रभाग क्र मांक १४ मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्याविरोधात देखील राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक अमित सरय्या यांच्याशी होणार असून मागील निवडणुकीत सरय्या यांनी बारटक्के यांचा पराभव केला होता. केणी विरुद्ध भोईर : प्रभाग क्र मांक २३ मध्ये मागील निवडणुकीसारखीच परिस्थिती असून यामध्ये राष्ट्रावादीचे मुकुंद केणी आणि प्रमिला केणी यांच्याविरोधात माजी उपमहापौर आणि भाजपाचे उमेदवार अशोक भोईर तसेच दीपा गावंड पुन्हा आमनेसामने आहेत.

Web Title: Big fight in 25 divisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.