धक्कादायक! आठवीच्या पुस्तकात मोठी चूक, भगतसिंह, राजगुरूंसह कुर्बान हुसेन फासावर गेल्याच्या उल्लेखानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 02:02 PM2020-07-17T14:02:58+5:302020-07-17T14:13:58+5:30
राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून ही घोडचूक कशी झाली हे अद्याप अस्पष्ट आहे.
पुणे : राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून बालभारतीच्या पुस्तकात मोठी चूक झाल्याचं उघडकीस आलं आहे. बालभारतीच्या इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू यांच्यासह फासावर गेलेल्या सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन या नावाचा उल्लेख केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आठवीच्या अभ्यासक्रमात असलेल्या पुस्तकातील एका धड्यात भगतसिंह, राजगुरु यांच्यासह कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून ही चूक कशी झाली हे अद्याप अस्पष्ट आहे.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू या तिघांची नावे देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहेत. मात्र प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांच्या “भारत माझा देश आहे” या पाठात या नावांमध्ये घोळ झाल्याची चूक निदर्शनास आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी केली आहे. आठवीच्या मराठीच्या पुस्तकातील चूक ही ‘गाढव चूक’ असून निंदनीय असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच हे पुस्तक त्वरित मागे घ्या आणि जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी दवे यांनी केली आहे. दुसरीकडे “ या प्रकरणाची शहानिशा करून चौकशी व्हावी. ही छपाईची चूक असू शकते, जाणूनबुजून कोणी केले असेल, असे वाटत नाही, असे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. एकूणच या मुद्द्यावरून वाद वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहे उल्लेख?
“देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम हवे, होय ना?”
“बरोबर आहे” मुले म्हणाली.
एक मुलगा म्हणाला, “भगतसिंह, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते”
मी विचारले “ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी…
हेही वाचा
Rajasthan Political Crisis: काहीतरी गडबड आहे! बरंच काही सांगून जातंय वसुंधरा राजेंचं मौन
नशीब फळफळलं!...अन् ती महिला रातोरात झाली करोडपती
गेहलोत सरकार पाडण्याचं केंद्रातल्या मंत्र्यांचं षडयंत्र, त्यांना अटक करा- सुरजेवाला
खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा
CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क
कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना