मोठी बातमी! भाजपा उद्या सत्तास्थापनेचा दावा करणार; फडणवीसांचा शपथविधी कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 10:48 PM2022-06-29T22:48:21+5:302022-06-29T22:49:09+5:30
उद्याच विधानसभेचा हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे उद्या मुंबईत आपल्या समर्थक आमदारांसह येणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजपाच्या गोटाच आनंद साजरा केला जात आहे. ताज हॉटेलवर सर्व आमदार जमले असून उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याची माहिती मिळत आहे.
उद्याच विधानसभेचा हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे उद्या मुंबईत आपल्या समर्थक आमदारांसह येणार आहेत. यानंतर भाजपा सत्तास्थापनेच्या हालचाली करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
१ जुलै रोजी शपथविधीचा कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता आहे. फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तसेच एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला किती मंत्रीपदे मिळतात, काय वाटाघाटी होतात, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले...
आम्ही हपालेले होऊन जात नाही. मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते विठ्ठलाची पूजा हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाही. मुस्लिमांनी पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा देतोय. मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो. सर्वांचे शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार मानतो असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.