Eknath Khadse: मोठी बातमी! एकनाथ खडसे यांना ED कडून समन्स, कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 07:39 PM2021-07-07T19:39:29+5:302021-07-07T19:41:09+5:30
Eknath Khadse ED : यापूर्वी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरींना ईडीकडून करण्यात आली होती अटक. एकनाथ खडसे यांनी ईडीनं बजावलं समन्स.
भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना रात्री ईडीने अटक केली. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला होता. परंतु त्यानंतर आता सक्तवसूली संचलनालयानं एकनाथ खडसे यांना समन्स बजावलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसूली संचलनालयानं (ED) समन्स बजावलं आहे. तसंच त्यांना गुरूवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी (Bhosari land scam) खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला खडसे सामोरे गेले होते. खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते. यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. मंगळवारी दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली.
Mumbai: Enforcement Directorate (ED) summons NCP leader Eknath Khadse, asking him to appear before them at 11 am tomorrow. pic.twitter.com/QepgnUd1Ex
— ANI (@ANI) July 7, 2021
यापूर्वी चौधरी यांना अटक
गिरीश चौधरी यांना ईडीनं मंगळवारी रात्री अटक केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्यादेखील अडचणी वाढतील की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होतं. झोटिंग समितीने आपल्याला क्लिन चिट दिल्याचे खडसे यांनी सांगितलं होतं. मात्र, पदाचा गैरवापर करून खडसे यांनी या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही जमिन एमआयडीसीची होती असं नंतर समोर आलं होतं.