मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 03:01 PM2024-09-21T15:01:42+5:302024-09-21T15:02:02+5:30

प्रकाश आंबेडकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर करण्यात आली.

Big news First list of 11 candidates announced by prakash ambedkar vanchit bahujan aghadi | मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Vidhan Sabha Election ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करून टाकली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत वंचितने ११ उमेदवारांची घोषणा केली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीतील मतदारसंघांमध्ये रावेर, सिंदखेड राजा,  वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली, नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव, खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.

कोणत्या मतदारसंघातून कोणाला मिळाली संधी?

१. रावेर - शमिभा पाटील
२. सिंदखेड राजा - सविता मुंढे
३. वाशिम- मेघा किरण डोंगरे
४. धामणगाव रेल्वे - निलेश विश्वकर्मा
५. नागपूर दक्षिण पश्चिम - विनय भांगे
६. साकोली - डॉ. अविनाश नन्हे
७. नांदेड दक्षिण- फारुक अहमद
८. लोहा - शिवा नरंगले
९. छत्रपती संभाजीनगर पूर्व - विकास दांडगे
१०. शेवगाव - किसन चव्हाण
११. खानापूर - संग्राम माने

दरम्यान, "आमच्यावर काहीही आरोप होत असले तरी आम्ही राज्यात सध्या सर्वच प्रमुख पक्षांचं सुरू असलेलं एकजातीय राजकारण मोडून काढण्यासाठी विविध समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे," असं या पत्रकार परिषदे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: Big news First list of 11 candidates announced by prakash ambedkar vanchit bahujan aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.