MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 10:33 PM2024-10-11T22:33:55+5:302024-10-11T22:34:10+5:30

गट-‘ब’ व गट-‘क’ असा सेवानिहाय पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Big news for MPSC students The commission took an important decision regarding these two exams | MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

MPSC Student ( Marathi News ) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ या सेवेतील विविध संवर्गाची भरती प्रक्रिया आयोगामार्फत केली जाणार असल्याचे आयोगाने कळवलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठ्या प्रमावर वाढ होत आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत होणारी वाढ, परीक्षा २०२३ च्या निकाल प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल प्रकरणे, न्यायालयीन निर्णय व त्यामुळे निकालास होणारा विलंब या सर्व बाबीचां विचार करून गट-‘ब’ (अराजपत्रित) सेवेतील विविध संवर्गाची स्वतंत्र पूर्व परीक्षा व गट ‘क’ सेवेतील विविध संवर्गाची स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. गट-‘ब’ व गट-‘क’ सेवांकरीता अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे राहणार आहे. परंतु गट-‘ब’ व गट-‘क’ असा सेवानिहाय पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा व महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त परीक्षेच्या परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आयोगाने कळवले आहे.

Web Title: Big news for MPSC students The commission took an important decision regarding these two exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.